शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

रेल्वे गाड्यात २४ हजार ३३४ विनापरवाना फेरीवाल्यांवर कारवाई; ३ कोटींचा दंड वसूल

By गणेश वासनिक | Updated: December 25, 2023 14:09 IST

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने राबविली मोहीम, एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या दरम्यान गाड्यांमध्ये तपासणी

अमरावती: मध्य रेल्वे विभागाच्या आरपीएफच्या फेरीवाला विरोधी पथकाने एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या दरम्यान धावत्या रेल्वे गाड्या, प्लॅटफार्मवर २४ हजार ३३४ विनापरवाना फेरीवाल्यांवर धडक कारवाई केली असून, ३ कोटी ५ लाखांचा दंड वसूल केला आहे. प्रवाशांच्या सुरक्षितेतसह चांगल्या दर्जाचे खाद्य पदार्थ, पेय मिळावे, यासाठी रेल्वे सुरक्षा बल निरंतरपणे विनापरवाना फेरीवाल्यांवर कारवाई करतात.

 मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या फेरीवाला विरोधी पथकाने अनधिकृत फेरीवाले आणि रेल्वेच्या परिसरात अतिक्रमण करणाऱ्या विनापरवाना फेरीवाल्यांविरुध्द अत्यंत यशस्वी मोहीम राबवली आहे.  ट्रेनमध्ये एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १४४ अंतर्गत २४,३३९ प्रकरणे नोंदवली गेली असून २४,३३४ जणांना अटक केली आहे आणि ३ कोटी ५ लाखांचा . दंड वसूल केला आहे. फेरीवाला उपद्रव आणि बेकायदेशीर गोष्टींना आळा घालण्यासाठी कारवाई करण्यात आली आहे. आरपीएफच्या कारवाईवर एक नजर....

• मुंबई विभागात ९३९४ गुन्ह्यांची नोंद झाली असून ९३९३ जणांना अटक करून १ कोटी २ लाखांचा दंड आकारला.  • भुसावळ विभागाने ७२०६ गुन्हे दाखल असून ७२०५ लोकांना अटक केली आहे. तर १ कोटी २९ लाख दंड वसूल केला. • नागपूर विभागात ३१८१ गुन्हे दाखल करण्यात आले आणि ३१७९ जणांना अटक केली असून १ लाखांचा दंड वसूल केला.  • पुणे विभागात १९९० गुन्हे दाखल असून १९९१ लोकांना अटक करण्यात आली आहे. १३ लाखा ८८ हजारांचा दंड वसूल केला. • सोलापूर विभागाने २५६८ गुन्हे दाखल केले आणि २५६६ लोकांना अटक केली. तसेच २५ लाख ८७ हजारांचा दंड वसूल केला. फेरीवाला विरोधी पथकाच्या सततच्या प्रयत्नांनी प्रवाशांची सुरक्षा आणि सुरक्षा सुनिश्चित करताना त्यांचे समर्पण आहे. हे परिणाम रेल्वे नेटवर्कची अखंडता राखण्यासाठी आणि प्रवाशांच्या हिताचे संरक्षण, रेल्वे अधिकारी आणि कायद्याची अंमलबजावणी करणारी बांधिलकी दर्शविणारी आहे.- जीवन चौधरी, जनसंपर्क अधिकारी, मुंबई