पीक विमा योजना राबविताना कुचराई केल्यास कारवाई
By Admin | Updated: July 20, 2016 00:06 IST2016-07-20T00:06:05+5:302016-07-20T00:06:05+5:30
पंतप्रधान पीक विमा योजना शेतकरी बांधवांसाठी उपयोगी असून प्रशासनाने लहान-सहान बांबींचा बागुलबुवा न करता सकारात्मकपणे योजना राबविणे आवश्यक आहे.

पीक विमा योजना राबविताना कुचराई केल्यास कारवाई
पालकमंत्री : शेतकऱ्यांना सहकार्य करा, अधिकाऱ्यांना तंबी
अमरावती : पंतप्रधान पीक विमा योजना शेतकरी बांधवांसाठी उपयोगी असून प्रशासनाने लहान-सहान बांबींचा बागुलबुवा न करता सकारात्मकपणे योजना राबविणे आवश्यक आहे. यात कुचराई केल्यास मुलाहिजा न ठेवता संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे पालकमंत्र्यांनी मंगळवारी प्रशासनला बजावले. तलाठ्याकडून पेरेपत्रक साक्षांकित नसल्यामुळे पीक विमा काढताना त्रास होत असल्याच्या तक्रारी पालकमंत्र्यांकडे शेतकऱ्यांनी प्राप्त केल्याने त्यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली.
पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये भात, ज्वारी, मका, तुर, मुग, उडीद, मुईमुग, तीळ, सोयाबिन, कापूस. इत्यादी पीकांचा समावेश आहे. शेतकऱ्यांसाठी ही योजना अतिशय फायदेशिर आहे जोखमीच्या बाबी-योजनेअंतर्गत जोखमींची व्याप्ता वाढविण्यात आली असून त्यामध्ये पिक पेरणीपासून काढणीपर्यंच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे पिकांच्या उत्पन्नात येणारी घट. हवामान घटकाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावनी न झाल्यामुळे होणारे नुकसान. पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान. काढणी पश्चात नुकसान आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसानीचा समावेश यामध्ये आहे .
स्वखर्चाने वाटली
२ लाख माहिती पत्रके
पंतप्रधान पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशिर असुन व विमा काढण्याची शेवटची तारीख ही ३१ जुलै असल्यामुळे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी स्वखर्चाने या पीक विमा योजनेची संपूर्ण माहिती असलेले २ लाख माहिती पत्रकांचे वाटप स्वत:ची यंत्रणा वापरून केले आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सामील व्हावे म्हणून पालकमंत्री आग्रही आहेत. पंतप्रधान पक विमा योजनेची पालकमंत्री दररोज प्रशासनाकडुन माहिती घेत आहे. पीक विमा काढताना कुचराई होत असल्यास ८३७८०८९००० या क्रमाकांवर व्हॉट्स अॅपवर तक्रार करावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.