काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर सुडबुध्दीने कारवाई
By Admin | Updated: February 5, 2016 00:11 IST2016-02-05T00:11:02+5:302016-02-05T00:11:02+5:30
माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यावर खटला भरण्यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी परवानगी दिली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर सुडबुध्दीने कारवाई
निषेध : जिल्हा काँग्रेस कमिटी आक्रमक
अमरावती : माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यावर खटला भरण्यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी परवानगी दिली आहे. राजकीय दबावामुळेच काँग्रेस नेत्यावर ही कारवाई केली जात असल्याचा आरोेप करून या कारवाईचा जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांच्यासह अनेकांनी गुरूवारी तीव्र निषेध नोंदविला.
‘आदर्श’ प्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांवर खटला भरण्यासाठी राज्यपालांनी परवानगी दिली आहे. यापूर्वीच अशोक चव्हाण यांची सीबीआय चौकशी करण्याकरिता राज्यपालांनी परवानगी दिली होती. मात्र, पुन्हा आदर्श प्रकरणी खटला दाखल करण्यासाठी भाजपाने राजकीय दबावतंत्राचा वापर केला. काँग्रेस नेत्याना बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी केला आहे.
तीव्र आंदोलनाचा इशारा
अमरावती : काँग्रेस पक्षाचा वाढत असलेला जनाधार भाजप नेत्यांना सहन होत नसल्याने पंतप्रधान, गृहमंत्री, मुख्यमंत्री व सर्व भाजप नेते राजकीय सुडभावनेतून सत्तेचा दुरूपयोग करून काँग्रेसला बदनाम करीत आहेत.
भाजपाची ही खेळी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी कदापि सहन करणार नाही. अशोक चव्हाण यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष ठामपणे उभा असून या अन्याय व बदनामीकारक कारवाई विरोधात जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत या कारवाईचा जिल्हा ग्रामीण काँग्रेस पक्षाने तीव्र निषेध नोंदविला आहे. आ. जगताप यांनीही भाजपच्या या कृतीचा निषेध केला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, आ. जगताप, जिल्हा परिषद अध्यक्ष सतिश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीश कराळे, प्रकाश काळबांडे, बापूराव गायकवाड, उमेश केने, गणेश आरेकर, अभिमान गवई, भागवत खांडे, संजय वानखडे, बिट्टू मंगरोळे, बंडू आठवले, राजेंद्र गोरले, बोबडे आणि पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)