पहिल्यांदाच छायाचित्रणात काठेवाडी गुरांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 05:01 IST2020-06-25T05:00:00+5:302020-06-25T05:01:23+5:30

चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत चिरोडी वनक्षेत्रात अवैध चराई रोखण्यासाठी वनविभागाने कंबर कसली आहे. चिरोडी वनवर्तुळातील दक्षिण चिरोडी बीटमधील वनखंड क्रमांक ३०५ मध्ये अवैध चराईची माहिती चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांना मिळाली. त्यांनी चिरोडी वर्तुळातील वनकर्मचाऱ्यांसह सापळा रचून दक्षिण चिरोडी बीटमध्ये अवैधरीत्या चराई करणाऱ्या गुरांवर छापा मारला.

Action on Kathewadi cattle for the first time in photography | पहिल्यांदाच छायाचित्रणात काठेवाडी गुरांवर कारवाई

पहिल्यांदाच छायाचित्रणात काठेवाडी गुरांवर कारवाई

ठळक मुद्देदोन गुराख्यांना अटक : चांदूर रेल्वे आरएफओंची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
पोहराबंदी : चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून काठेवाडी गुरांची वनक्षेत्रात चराई केल्याप्रकरणी दोन पशुमालकांवर कारवाई करण्यात आली. त्यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना वनकोठडी सुनावली. यादरम्यान त्यांच्याकडून झालेल्या वनचराईचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले आहे.
चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत चिरोडी वनक्षेत्रात अवैध चराई रोखण्यासाठी वनविभागाने कंबर कसली आहे. चिरोडी वनवर्तुळातील दक्षिण चिरोडी बीटमधील वनखंड क्रमांक ३०५ मध्ये अवैध चराईची माहिती चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांना मिळाली. त्यांनी चिरोडी वर्तुळातील वनकर्मचाऱ्यांसह सापळा रचून दक्षिण चिरोडी बीटमध्ये अवैधरीत्या चराई करणाऱ्या गुरांवर छापा मारला. छापा मारताच वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांचे पथक पाहून यावेळी अवैध चराई करणारे जवळपास २०० ते ३०० गुरे पळवून नेण्यात गुराखी यशस्वी झाले. दरम्यान, आरोपी लक्ष्मण खेंगार बोडिया व देवकन जयसिंग मिर यांना घटनास्थळी पकडण्यात आले. ही कारवाई उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे, सहायक वनसंरक्षक ज्योती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांनी आरोपींना ताब्यात घेऊन पुढील प्रकरण न्यायालयाकडे सोपविले. ‘लोकमत’ने काठेवाडी गुरांच्या अवैध चराईचे प्रकरण लावून धरले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

कारवाईदरम्यान व्हिडीओ-शूटिंग
राखीव वन आणि अतिसंरक्षित वनक्षेत्रात काठेवाडी गुरे आढळल्यास आता व्हिडीओ शूटिंगद्वारे कारवाई केली जाणार आहे. अवैध चराईचे छायाचित्रण घेतले जाईल. त्यानंतर पशुमालकांवर वनसंवर्धन अधिनियमानुसार कारवाई करून पुढील प्रकरणे न्यायालयात दाखल करण्यात येईल. चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या नेतृत्वात वनपाल, वनरक्षक, वनमजूर अशी फळी अवैध चराई रोखण्यासाठी कामाला लागली आहे.

चांदूर रेल्वे वनविभागाची कारवाई
चिरोडी वर्तुळातील दक्षिण चिरोडी बीट वनखंड क्रमांक ३०५ या वनक्षेत्रालगत राहुट्या करून राहणाºया पशुमालकांवर अवैध चराईप्रकरणी वनगुन्हा दाखल करण्यात आला. त्यांमध्ये आरोपी लक्ष्मण खेंगार बोडिया, मानावेन देवगर मिर, मनुबेन विठ्ठल मिर, हिराबेन देवा बोडिया, देवा भुरा बोडिया, मदन खेंगार बोडिया, देवकन जयसिंग मिर, माला देवकन मिर यांचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ (१)(ड)(फ), (ह)(१-अ) अ २०१४ मधील नियम १३ अन्वये वनगुन्हा क्रमांक १८/११ जारी करून यापैकी दोघांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने वनकोठडी सुनावली आहे.

Web Title: Action on Kathewadi cattle for the first time in photography

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.