रिद्धपूर शिवारात अवैध बोअरवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:13 IST2021-05-07T04:13:01+5:302021-05-07T04:13:01+5:30
फोटो पी ०६ रिध्दपूर फोल्डर मोर्शी : तालुक्यातील रिद्धपूर शेतशिवारामधील मौजा नजरपूर येथील एका शेतामध्ये अवैधरीत्या बोअर करण्याचे ...

रिद्धपूर शिवारात अवैध बोअरवर कारवाई
फोटो पी ०६ रिध्दपूर फोल्डर
मोर्शी : तालुक्यातील रिद्धपूर शेतशिवारामधील मौजा नजरपूर येथील एका शेतामध्ये अवैधरीत्या बोअर करण्याचे काम चालू असताना माहितीच्या आधारावर येथील महसूल विभागाने के.ए.०१ एम एन २७२९ क्रमांकाची बोरिंग मशीनसह के.ए. ०१ एम.पी. ७६११ अशी दोन वाहने ताब्यात घेतली.
मोर्शी तालुका हा ड्राय झोनमध्ये येत असल्याने या तालुक्यात काही ठिकाणी बोअर करण्यास बंदी आहे. मात्र, सिंचनाचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने अवैधरीत्या बोअर करण्याच्या घटनेत वाढ होत आहे. नजरपूर शेत शिवार येथील शेतमालक पवनसिंह बैस यांच्या शेतात अवैधरित्या बोअर खोदण्याचे काम सुरू असल्याची माहिती तहसील कार्यालयाला मिळाल्यावरून रिद्धपूरचे तलाठी आर. बी. संतापे आणि कोळविहीरच्या तलाठी एम.एस. खाडे यांनी घटनास्थळावर जाऊन बोअर मशीनसह सपोर्ट वाहन ५ मे रोजी ताब्यात घेतले. घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही वाहन जप्त करून पुढील कारवाईकरिता तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांच्या स्वाधीन केले ती वाहने पोलिसांच्या निगराणीत ठेवण्यात आले आहेत.