इडली ॲन्ड चाट्स साऊथ इंडियन हॉटेलवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:13 IST2021-04-24T04:13:06+5:302021-04-24T04:13:06+5:30

अमरावती : जिल्हा परिषद ते फ्रेजरपुरा ठाणे मार्गावरील मिस्टर इडली ॲन्ड चाटस् साऊथ इंडियन हॉटेलच्या संचालकावर कारवाई करून ...

Action on Idli & Chats South Indian Hotel | इडली ॲन्ड चाट्स साऊथ इंडियन हॉटेलवर कारवाई

इडली ॲन्ड चाट्स साऊथ इंडियन हॉटेलवर कारवाई

अमरावती : जिल्हा परिषद ते फ्रेजरपुरा ठाणे मार्गावरील मिस्टर इडली ॲन्ड चाटस् साऊथ इंडियन हॉटेलच्या संचालकावर कारवाई करून कलम १८८ अंतर्गत गुन्हा नोंदविला. सकाळी ११ वाजतानंतर सुद्धा आस्थापना उघडी ठेवून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिकेच्या पथकाने दहा हजारांचा दंड ठोठाविला.

यावेळी फ्रेजरपुरा ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम व पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले. त्यांनी संचारबंदी नियमांचे पालन करावे लागले अशा प्रकारे आंबे विक्री व इतर ग्राहकांना गोळा करता येणार नसल्याचा संचालकाला दम भरला. यावेळी महापालिकेच्या पथकातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यानी हॉटोलच्या संचालकाला दहा हजाराचा दंड दिला. या कारवाईमुळे हॉटेल व्यवसायिकांची धाब दणाणले आहे. कलम १८८ अंतर्गत गुन्हा नोंदविल्याची माहिती ठाणेदार पुंडलिक मेश्राम यांनी दिली.

Web Title: Action on Idli & Chats South Indian Hotel