‘आॅफलाईन’ किरकोळ खत विक्रेत्यांवर कारवाई
By Admin | Updated: May 10, 2014 23:58 IST2014-05-10T23:58:10+5:302014-05-10T23:58:10+5:30
शेतकर्यांना वेळेवर आणि योग्य दरात रासायनिक खतांचा पुरवठा व्हावा याकरिता केंद्र शासनाने खते संनियंत्रण प्रणाली (मोबाईल फर्टीलायझर मॉनिटरींग सिस्टीम) सुरु केली.

‘आॅफलाईन’ किरकोळ खत विक्रेत्यांवर कारवाई
अमरावती : शेतकर्यांना वेळेवर आणि योग्य दरात रासायनिक खतांचा पुरवठा व्हावा याकरिता केंद्र शासनाने खते संनियंत्रण प्रणाली (मोबाईल फर्टीलायझर मॉनिटरींग सिस्टीम) सुरु केली. यासाठी ठोक व किरकोळ खत विक्रेत्यांनी ‘आॅनलाईन’ होणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील १०८ ठोक खत विक्रेते ‘आॅनलाईन’ झालेत मात्र ९९९ किरकोळ खत विक्रेत्यापैकी ९३१ खत विक्रेते ‘आॅफलाईन’ आहेत. नोंदणी नसनार्या दुकानदाराचा खत पुरवठा बंद करण्याचे आदेश असताना कृषी विभागाची कारवाई का नाही, असा शेतकर्यांचा सवाल आहे. रासायनिक खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण करुन काळ्या बाजारात वाढीव दराने विक्री करण्यात येते, कृषी केंद्रावर शेतकर्यांच्या रांगा लागतात यामध्ये शेतकर्यांची आर्थिक लुट होते. शेतकर्यांची लूट होत असल्याचे निदर्शनात आल्याने केंद्र सरकारने रासायनिक खते संनियंत्रण प्रणाली सुरु केली. या अंतर्गत ठोक किरकोळ खत विक्रेत्यांना ‘आॅनलाईन’ होणे बंधनकारक केले आहे. सद्यास्थितीत जिल्ह्यातील फक्त १०८ ठोक विक्रेते ‘आॅनलाईन’ झाले आहेत. ९५ टक्के खत विक्रेते अजूनही आॅफलाईन आहेत. यासाठी फेब्रुवारी २०१४ ही ‘डेडलाईन’ होती मात्र जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या गलथान कारभारामुळे किरकोळ खत विक्रेत्यांनी दुर्लक्ष केले आहे. (प्रतिनिधी)