नांदगाव पेठ टोलनाक्याविरुद्ध कृती समिती आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:39 IST2021-01-08T04:39:16+5:302021-01-08T04:39:16+5:30
अमरावती : शहरालगतच्या नांदगाव पेठ येथील आयआरबीच्या टोल नाक्याला स्थानिक नागरिकांनी विरोध करीत गुरुवारी महात्मा गांधी यांच्या पुतळयासमोर शांततेच्या ...

नांदगाव पेठ टोलनाक्याविरुद्ध कृती समिती आक्रमक
अमरावती : शहरालगतच्या नांदगाव पेठ येथील आयआरबीच्या टोल नाक्याला स्थानिक नागरिकांनी विरोध करीत गुरुवारी महात्मा गांधी यांच्या पुतळयासमोर शांततेच्या मार्गाने आंदोलन केले. आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले.
नांदगाव पेठ टोलनाका परिसरातील गावांतील नागरिकांना या टोलवर १०० रुपये माेजावे लागतात. त्यामुळे नागरिकांनी अनेकवेळा केंद्रीय रस्ते विकास मंत्र्यांना निवेदन दिलेत. त्यावेळी लोकसभा निवडणुकीदरम्यान नागरिकांना आश्र्वासन देण्यात आले. मात्र, अद्याप टोलमुक्त न झाल्याने कृती समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. कृती समितीने या विरोधात येत्या ८ जानेवारीला मोशी, वरूड पोलीस ठाण्यात फौजदारी तक्रार दाखल करणे, १६ जानेवारीला नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर आंदोलन करणे, १८ ते २२ जानेवारी दरम्यान नांदगाव पेठ टोलवर सांकेतिक आंदोलन, तर २५ जानेवारील टोलमुक्तीकरिता टोलनाक्यावर तिरंगा आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाला आता विविध संघटनांनी पाठिंबा दिल्याची माहिती पत्रकार परिषदेत विक्रम ठाकरे, नितीन मोहोड, प्रदीप बाजड, संजय पांडव, आशिष टाकोडे, विशाल तिजारे, नीलेश रोडे, नीलेश गणवाडे, रवि यावलकर, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.