आता शहरातील आॅटोरिक्षांवर कारवाई
By Admin | Updated: July 31, 2015 00:48 IST2015-07-31T00:48:29+5:302015-07-31T00:48:29+5:30
शहर वाहतूक शाखेच्या तीनही झोनमध्ये गुरूवारपासून आॅटोरिक्षांविरूध्द मोहीम उघडण्यात आली आहे.

आता शहरातील आॅटोरिक्षांवर कारवाई
वाहतूक शाखेचे अभियान : पहिल्याच दिवशी ५० आॅटोरिक्षा जप्त
अमरावती : शहर वाहतूक शाखेच्या तीनही झोनमध्ये गुरूवारपासून आॅटोरिक्षांविरूध्द मोहीम उघडण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत पहिल्याच दिवशी ४० आॅटोरिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली.
शहर पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांच्या आदेशानुसार मागील पंधरा दिवसांपासून शहर वाहतूक शाखेद्वारा राजापेठ, फ्रेजरपुरा आणि गाडगेनगर झोनअंतर्गत अल्पवयीन व विनापरवाना वाहनधारकांविरूध्द विशेष अभियान राबविण्यात येत आहे. सुरूवातीला ट्रीपल सीट वाहनधारकांविरूध्द कारवाई करण्यात आली. शहरात अल्पवयीन मुले हुल्लडबाजी करीत वाहने चालवितात. तसेच तिब्बल सीट वाहने दामटतात. त्यामुळे निरपराध वाहनधारकांना याचा त्रास सहन करावे लागते. त्यामुळे वाहतुकीची शिस्त बिघडते. अमरावती शहर वाहतूक शालेच्या पोलीस नीलिमा आरज यांनी गांभीर्या घेऊन अल्पवयीन वाहनधारकांवर कारवाई करताना वाहतूक पोलिसांनी त्यांना वाहतूक नियमांचे धडेही दिले. आता गुरूवारपासून शहरातील तीनही वाहतूक विभागांतर्गत आॅटोरिक्षाचालकांविरूध्द मोहीम उघडण्यात आली आहे. परमिटचे नुतनीकरण न केलेल्या आॅटोरिक्षा चालकांविरूध्द तसेच विनापरवाना व बॅचनंबर नसताना शहरात आॅटोरिक्षा चालविणाऱ्या चालकांच्या कागदपत्रांची तपासणी करून ही कारवाई केली जात आहे. कारवाईच्या पहिल्याच दिवशी तिनही शाखांमध्ये ५० अधिक आॅटोरिक्षा ‘डिटेन’ करण्यात आले. राजापेठ शाखेंतर्गत १९, गाडनेनगर शाखेंतर्गत १२ व फ्रेजरपुरा शाखेंतर्गत १९ आॅटोरिक्षा जप्त करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)