तीन दिवसांत २२५ वीजचोरांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:16 IST2021-02-27T04:16:56+5:302021-02-27T04:16:56+5:30
अमरावती : परिमंडळात वीजचोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी महावितरणने आता ‘ॲक्शन मोड’वर आले आहे. तीन दिवसांत अमरावती व यवतमाळ ...

तीन दिवसांत २२५ वीजचोरांवर कारवाई
अमरावती : परिमंडळात वीजचोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी महावितरणने आता ‘ॲक्शन मोड’वर आले आहे. तीन दिवसांत अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी धाडी घालून वीजचोरीच्या २२५ घटना उघड करण्यात आल्या आहेत.
परिमंडळातील थकबाकी वसुलीचे आवाहन समोर असताना परिमंडळ अंतर्गत अमरावती जिल्ह्यात वीजचोरी थांबविण्याचे मोठे आव्हान महावितरण उभे ठाकले आहे. याविरोधात महावितरणने २३ ते २५ फेब्रुवारी या तीन दिवसांच्या कालावधीत वीजचोरीविरोधात धडक मोहीम राबवित २२५ वीजचोरांवर कारवाई केली. यामध्ये
थेट किंवा मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करणाऱ्यांची संख्या ही १९१ आहे, तर ३४ ग्राहकांनी ज्या कामासाठी विजेची मागणी केली होती, त्यासाठी न वापरता स्वत:च्या फायद्यासाठी वापरून महावितरणची फसवणूक केली. एकूण १ लाख २८ हजार ८६० युनिट आणि १३ लक्ष ७२ हजार रुपयांची वीजचोरी करण्यात आल्याचे या मोहिमेत उघड झाले आहे. वीजचोरीप्रकरणी संबंधित वीज ग्राहकांनी दंडासह रक्कम भरली नाही, तर संबंधितावर विद्युत कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
आधीच थकबाकी वसूल न झाल्याने महावितरण आर्थिक अडचणींतून जात असताना, वीजचोरीमुळे महावितरणला आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे यापुढे महावितरण अमरावती परिमंडळ अंतर्गत वीजचोरांवर कठोर कारवाईसाठी धडक मोहीम राबविण्याचे निर्देश क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले.
बॉक्स
जिल्ह्यातील वीजचोरी प्रकरणांमध्ये याप्रमाणे कारवाई
अमरावती शहर विभाग - ७
अमरावती ग्रामीण विभाग - २८
मोर्शी विभाग - २१
अचलपूर विभाग - २५
वीजचोरी - ८१
युनिट मेगावॅट- ३४४६
रक्कम रुपये - ३,१७३३७