एका महिन्यात १४,६३७ वाहन चालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:22 IST2021-03-13T04:22:57+5:302021-03-13T04:22:57+5:30

अमरावती : शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी व फिक्स पॉईंट लावून तसेच लॉकडाऊमध्ये विनाकारण फिरणाऱ्या १४,६६७ वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारून ...

Action against 14,637 drivers in a month | एका महिन्यात १४,६३७ वाहन चालकांवर कारवाई

एका महिन्यात १४,६३७ वाहन चालकांवर कारवाई

अमरावती : शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी व फिक्स पॉईंट लावून तसेच लॉकडाऊमध्ये विनाकारण फिरणाऱ्या १४,६६७ वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारून आतापर्यंत २२,९१,००० रुपयांचा तडजोड शुल्क वाहनचालकांकडून पोलिसांनी वसूल केला. ही कारवाई ७ फेब्रुवारी ते ११ मार्च दरम्यान करण्यात आली.

मास्क न लावणे, सामाजिक अंतर न पाळणे, एकत्र जमा होणे तसेच नियमांचे उल्लंघन करणे अशा एकूण ७८० जणांवर भादंविचे कलम १८८ व इतर कलमान्वये गुन्हा नोंदविला. कोरोनाचे संकट अद्यापही टळले नसून नागरिकांनी नियमांचे पालन करावे तसेच पोलिसांना व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी केले. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी तसेच कोरोनाची लढाई जिंकणे हे सर्वांचे कर्तव्य असल्याच्या त्या म्हणाल्या.

Web Title: Action against 14,637 drivers in a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.