विनामास्क १० लोकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:09 IST2021-07-19T04:09:57+5:302021-07-19T04:09:57+5:30

------------ ग्रामस्थाकडे ठेवण्यास दिलेल्या रकमेची चोरी नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील कोव्हळा खानापूर येथे राजू मारोतराव निंबर्ते (४५) यांच्या घरातील ...

Action against 10 people without mask | विनामास्क १० लोकांवर कारवाई

विनामास्क १० लोकांवर कारवाई

------------

ग्रामस्थाकडे ठेवण्यास दिलेल्या रकमेची चोरी

नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील कोव्हळा खानापूर येथे राजू मारोतराव निंबर्ते (४५) यांच्या घरातील अलमारीमधून १५ हजारांची रोकड व चांदीचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले. गावातील सुनील कराडे यांनी त्यांना १६ हजार रुपये ठेवायला दिले होते. त्यांच्या नव्या घराला दारे-खिडक्या नाहीत. त्याचा फायदा चोरट्याने घेतला. १६ जुलै रोजी ही चोरी झाली. नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

------------

उमरी इतबारपूर येथे अतिक्रमिकांविरुद्ध गुन्हा

वनोजा बाग : अतिक्रमण निर्मूलनासाठी पंचायत समितीतील अधिकाऱ्यांसमवेत गेलेल्या ग्रामपंचायत सदस्याला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी उमरी इतबारपूर येथील गोपाल ओंकार काळंके (४०), मोहन ओंकार काळंके (५०), अक्षय प्रल्हाद काळंके (२६), योगेश गोपाल काळंके (३०), वैभव गोपाल काळंके (२१), आशिष गोपाल काळंके (१८) यांच्याविरुद्ध रहिमापूर पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

-----------------

जुन्या वैमनस्यातून युवकाला मारहाण

शेंदूरजनाघाट : नजीकच्या मलकापूर येथे दिनेश सुधाकर आहाके (४०) यांना जुन्या वैमनस्यातून चंदू बोथे (४०) याने मारहाण केल्याची तक्रार शेंदूरजनघाट पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. १६ जुलै रोजी ही घटना घडली. पोलिसांनी १७ जुलै रोजी गुन्हा नोंदविला.

-------------

मद्यपी युवकाची महिलेला मारहाण

शिरखेड : नजीकच्या नेरपिंगळाई येथील ईश्वर मोहन गोखले (३६) या मद्यपी युवकाने पोलिसांत दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी ३६ वर्षीय महिलेला लाकडी रिपने मारहाण केली. शिरखेड पोलिसांनी १७ जुलै रोजी गुन्हा दाखल केला.

Web Title: Action against 10 people without mask