शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
2
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
3
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
4
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
6
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
7
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
8
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
9
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
10
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
11
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
12
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
13
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
14
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
15
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
16
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
17
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
18
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
19
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
20
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर

पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर ‘अ‍ॅक्शन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 06:00 IST

अमरावती शहरातील अवैध दारू, गुटखा हद्दपार करा, पोलिसांचा धाक असायला हवा, त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करा, सायंकाळपासूनच कामाला लागा, असे सोमवारी ना. यशोमती ठाकूर यांनी पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाला आदेशित केले होते. त्यांच्या आदेशावर अंमलबजावणी शहर पोलिसांनी सोमवारी सायंकाळपासूनच सुरू केली.

ठळक मुद्देमहापालिकेचा अतिक्रमणावर गजराज : अवैध धंद्यावर धाडसत्र, २५ जणांवर गुन्हे

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महिला व बाल कल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी कायदा व सुव्यवस्थेसंबंधी आढावा बैठकीत दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने पोलीस विभागाने सोमवारी सायंकाळपासूनच कारावायांचा सपाटा सुरु केला. शहरात दारूबंदी कायद्यान्वये २५ जणांविरुद्ध गुन्हे नोंदविले असून, रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या तपासणीसंदर्भात पोलीस उपायुक्तांनी आयुक्तालय हद्दीतील सर्व ठाण्यांना सूचना दिल्या आहेत.अमरावती शहरातील अवैध दारू, गुटखा हद्दपार करा, पोलिसांचा धाक असायला हवा, त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करा, सायंकाळपासूनच कामाला लागा, असे सोमवारी ना. यशोमती ठाकूर यांनी पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाला आदेशित केले होते. त्यांच्या आदेशावर अंमलबजावणी शहर पोलिसांनी सोमवारी सायंकाळपासूनच सुरू केली. शहरातील दहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अवैध दारूविक्रीवर धाडसत्र सुरू करण्यात आले आहेत. सोमवारी तब्बल १५ ठिकाणी धाडी टाकून आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले. त्याचप्रमाणे मंगळवारी उशिरापर्यंत प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाईचा सपाटा सुरूच होता. याशिवाय पोलीस उपायुक्तांनी सर्व पोलीस ठाण्यांना सूचना देऊन रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि तडीपारांच्या तपासणीचे निर्देश दिले. त्यानुसार पोलिसांनी गुन्हेगारांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. वाहतूक शाखेनेही आपली कंबर कसली असून, नियमबाह्य वाहतुकीवर कारवाईचे सत्र मंगळवारी दिवसभर राबविण्यात आले.वाहतूक पोलिसांकडून २०० कारवायापालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी वाहतूक समस्येवर फोकस करून वाहतुकीला शिस्त लावण्यासंदर्भात पोलिसांना निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वाहतूक शाखेच्या पोलिसांना सूचना दिल्या. त्यानुसार नो-पार्किंग, ट्रिपल सीट, विनापरवाना वाहन चालविणे आदी नियमभंगप्रकरणी तब्बल २०० वाहनधारकांविरुद्ध कारवाई करण्यात आली.पोलिसांच्या एफडीएला सूचनाएफडीएला गुटखासंबंधी कारवाईसाठी मनुष्यबळ पुरविण्यात येईल, असे पोलीस विभागाने सुचविले आहे. त्यामुळे आता पोलीस संरक्षणात यासंबंधी कारवाईचा सपाटा सुरू केला जाणार आहे. 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण