शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

२५ टक्के गुणवाढप्रकरणी ४५० परीक्षकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 06:00 IST

सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार परीक्षा झाल्यापासून ४५ दिवसांच्या आत निकाल जाहीर होणे नियमावली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर पुनर्मूल्यांकनासाठी एकच झुंबड उडत असते. परीक्षेत मूल्यांकन व्यवस्थित झाले नाही; पेपर नीट सोडविला असताना गुण कमी का मिळाले, अशी विचारणा करण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालक वर्ग विद्यापीठात गर्दी करतात.

ठळक मुद्देपाच हजारांचा दंड, सेवापुस्तिकेत नोंद : व्यवस्थापन परिषदेचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी २०१८ परीक्षेत पुनर्मूल्यांकनात २५ टक्के गुणवाढ होऊन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. याप्रकरणी ४५० परीक्षकांवर कारवाई प्रस्तावित केली असून, प्रतिपरीक्षक पाच हजार रुपये दंड आणि सेवापुस्तिकेत नोंद केली जाणार आहे. विद्यापीठ कायद्यानुसार व्यवस्थापन परिषदेने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परीक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार परीक्षा झाल्यापासून ४५ दिवसांच्या आत निकाल जाहीर होणे नियमावली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर पुनर्मूल्यांकनासाठी एकच झुंबड उडत असते. परीक्षेत मूल्यांकन व्यवस्थित झाले नाही; पेपर नीट सोडविला असताना गुण कमी का मिळाले, अशी विचारणा करण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालक वर्ग विद्यापीठात गर्दी करतात. हा दरवर्षीचा अनुभव आहे. त्यामुळे परीक्षा विभागाने ‘अंडर व्हॅल्यूएशन आणि ओव्हर व्हॅल्यूएशन’ अंतर्गत पुनर्मूल्यांकनात विद्यार्थ्यांची २५ टक्के गुणवाढ झाल्यास अशा परीक्षकांवर पाच हजार रुपये दंड आणि त्यांच्या सेवापुस्तिकेत याबाबत नोंद करण्याला सुरुवात केली आहे. हिवाळी २०१८ परीक्षेत बहुतांश विद्यार्थ्यांनी पेपर व्यवस्थित सोडविले असताना, गुण कमी अथवा नापास का झालो, ही विचारणा करण्यासाठी कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर आणि परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांच्याकडे एकच गर्दी केली होती.विद्यापीठ कायद्यानुसार विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकन आणि उत्तरपत्रिकांची छायापत्र घेण्याची संधी आहे. त्यावरून हिवाळी २०१८ परीक्षेत २४ हजार ८५० विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकन अर्ज सादर केले होते. त्यापैकी ६२५ विद्यार्थ्यांना २५ टक्के गुणवाढ मिळाली होती. याप्रकरणी ४५० परीक्षकांवर कारवाई करण्यात येणार आहे. मूल्यांकनात दिरंगाई आणि दुर्लक्षाचा ठपका ठेवत प्रत्येकी पाच हजार रूपये दंड आणि सेवापुस्तिकेत नोंद अशी कारवाई होणार आहे. संबंधित परीक्षकांना नोटीस बजावण्यात आली आहे.विद्यापीठाच्या हिवाळी २०१८ परीक्षेत २५ टक्क्यांपेक्षा जास्त गुणवाढ झाल्याप्रकरणी कायद्यानुसार ४५० परीक्षकांना कारवाईची नोटीस पाठविली आहे. पाच हजार रुपये दंड आणि सेवापुस्तिकेत नोंद असे त्याचे स्वरूप आहे.- हेमंत देशमुखसंचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ.

टॅग्स :universityविद्यापीठEducation Sectorशिक्षण क्षेत्र