अचलूपरमध्ये ९ पैकी ५ ठिकाणी अविरोध एक रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:13 AM2021-02-12T04:13:41+5:302021-02-12T04:13:41+5:30

निंभारी, खैरी, सावळापूर, कुष्टा खुर्द, येसुर्णा या ग्रामपंचायती अविरोध झाल्या. निंभारी येथे अविनाश बडवाईक व पद्मा इंगळे, खैरी येथे ...

In Achlupar, 5 out of 9 places are unopposed | अचलूपरमध्ये ९ पैकी ५ ठिकाणी अविरोध एक रिक्त

अचलूपरमध्ये ९ पैकी ५ ठिकाणी अविरोध एक रिक्त

Next

निंभारी, खैरी, सावळापूर, कुष्टा खुर्द, येसुर्णा या ग्रामपंचायती अविरोध झाल्या. निंभारी येथे अविनाश बडवाईक व पद्मा इंगळे, खैरी येथे राजकन्या चव्हाण व विशाल काळे, सावळापूर येथे रूपाली मांगे व श्रेयस फाटे, कुष्टा खुर्द येथे सुनीता पवार व अंजू सरवटकर, येसुर्णा येथे संजीवनी वानखडे व श्रीकांत निंघोट हे सरपंच, उपसरपंच ठरले. वडनेर भुजंग येथे सरपंचपद रिक्त असून, उपसरपंचपदी लता मोहोड अविरोध निवडणूक आल्या आहेत.

कुष्टा बु. येथे अमृता उमक व वृषाली शेलाकार, तर शिंदी बु. येथे रजनी गजभिये व मोहम्मद शहजाद शे. मुस्तफा हे गुप्त मतदानाने सरपंच व उपसरपंच ठरले. पांढरी येथे ललिता पाटणकर व विनोद जामकर हे हात उंचावून मतदानाने सरपंच-उपसरपंच ठरले.

Web Title: In Achlupar, 5 out of 9 places are unopposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.