अचलपूर, वरूड, अंजनगाव, दर्यापूर ‘हॉटस्पॉट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 05:00 IST2020-09-11T05:00:00+5:302020-09-11T05:00:56+5:30
१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या कालावधीत सर्व तालुक्यात १,८७८ कोरोना संक्रमित आढळले . यामध्ये १,१७७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने ६६८ रूग्णांवर उपचार सुरु आहे.आतापर्यत १४ पैकी ९ तालुक्यामध्ये ३३ जणांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाचे अहवालात नमूद आहे. सर्वच तालुक्यात कोरोना विषाणूचा संसर्ग पोहोचला आहे. सुरूवातील शहराचे तुलनेत ग्रामीण भागात कोरोनाचा प्रकोप कमी होता.

अचलपूर, वरूड, अंजनगाव, दर्यापूर ‘हॉटस्पॉट’
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ग्रामीण भागातील कोरोना ग्रस्तांची संख्या लक्षात घेता अचलपूर, वरूड, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर हे चार तालुके सध्या हॉटस्पॉट बनले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. कोरोनाचे संकट दूर सारण्यासाठी ग्रामीण भागाची धूरा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग सांभाळत आहे.
१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या कालावधीत सर्व तालुक्यात १,८७८ कोरोना संक्रमित आढळले . यामध्ये १,१७७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने ६६८ रूग्णांवर उपचार सुरु आहे.आतापर्यत १४ पैकी ९ तालुक्यामध्ये ३३ जणांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाचे अहवालात नमूद आहे. सर्वच तालुक्यात कोरोना विषाणूचा संसर्ग पोहोचला आहे. सुरूवातील शहराचे तुलनेत ग्रामीण भागात कोरोनाचा प्रकोप कमी होता. मात्र, ऑगस्ट महिन्यापासून रूग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या चार तालुक्यासह अन्य तालुक्यातही आधीपासूनच रुग्णांची संख्या कमी-जास्त होत आहे. त्यामुळेच या तालुक्यांवर जिल्हा परिषदेने यापूर्वीच लक्ष केंद्रित केले होते. मागील काही दिवसांपासून अचलपूर, वरूड, अंजनगाव सुर्जी आणि दर्यापूर या तालुक्यांमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेने यावर लक्ष केंद्रीत केले आहे. ४० दिवसांत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे १८७८ कोरोना संक्रमिताची नोंद ९ सप्टेबरचे सांयकाळपर्यत करण्यात आली आहे. त्यापैकी ११७७ रूग्णांनी या आजारावर यशस्वीपणे मातकेलेली आहे.
जिल्हा ग्रामीणमध्ये आतापर्यत ३३ नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. सद्यस्थितीत अमरावती, अचलपूर, नांदगाव व इतर कोविड केंद्रांमध्ये ६६७ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी दिली. सर्वाधिक ११४ रुग्ण अचलपूर तालुक्यातील आहेत. त्यापाठोपाठ वरुड तालुक्यात ७३, दर्यापूर ७१ आणि अंजनगाव सुर्जी तालुक्यात रूग्णांची संख्या जास्त आहे. याशिवाय अन्य १० तालुक्यातील रूग्णांचा यामध्ये समावेश आहे.
चार तालुक्यात काही दिवसात रूग्ण संख्या वाढलेली आहे. वाढती रूग्ण संख्या लक्षात घेता आरोग्य विभागाने सर्वच तालुक्यांकडे लक्ष केंद्रीत करून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहे.सीईओंच्या मार्गदर्शनात खबरदारीसाठी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत.
- डॉ. दिलीप रणमले
जिल्हा आरोग्य अधिकारी