अचलपूृर पालिका शिक्षकांचे पगार रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:23 IST2021-02-05T05:23:42+5:302021-02-05T05:23:42+5:30

: बाहेरच्या पानावर परतवाडा : अचलपूर नगरपालिकेच्या २५ प्राथमिक शाळांमधील ११६ शिक्षक व प्राथमिक शिक्षण विभागातील तीन शिक्षकेतर कर्मचारी ...

Achalpur Municipal Corporation teachers' salaries stagnant | अचलपूृर पालिका शिक्षकांचे पगार रखडले

अचलपूृर पालिका शिक्षकांचे पगार रखडले

:

बाहेरच्या पानावर

परतवाडा : अचलपूर नगरपालिकेच्या २५ प्राथमिक शाळांमधील ११६ शिक्षक व प्राथमिक शिक्षण विभागातील तीन शिक्षकेतर कर्मचारी मिळून एकूण ११९ जणांना अजूनपर्यंत डिसेंबरचे वेतन मिळालेले नाही. डिसेंबरपाठोपाठ जानेवारीही विनावेतन गेल्यामुळे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आर्थिक अडचणीत आले आहेत.

नगरपालिकेच्या या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाकरिता शिक्षण उपसंचालकांकडून ८० टक्के अनुदान प्राप्त होते. तर, २० टक्के अनुदान नगरपालिकेला द्यावे लागते. मात्र, नगरपालिका आपल्या हिस्स्याचे २० टक्के अनुदान उपलब्ध करुन देत नाही. नगरपरिषदेच्या शिक्षण विभागाकडून पालिका प्रशासनाकडे वेळोवेळी या २० टक्क्यांची मागणी केली जाते. पण त्याकडे दुर्लक्ष केली जात आहे. यात अन्य बाबींची पूर्तता करणेही शिक्षण विभागाला कठीण होऊन बसले आहे.

कोट

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाकरिता आवश्यक २० टक्के अनुदान नगरपरिषदेकडून न मिळाल्यामुळे शिक्षकांचे डिसेंबरचे वेतन होऊ शकले नाही. २० टक्के रक्कम मिळताच शिक्षकांचे पगार होतील.

संजय तळोकार

प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग, न. प. अचलपूर

कोट

नगरपरिषद प्राथमिक शिक्षकांचे माहे डिसेंबरचे वेतन अजूनपर्यंत झालेले नाही. शिक्षकांच्या नियमित वेतनासह मार्च महिन्यातील २५ टक्के वेतन, डीएचा फरक शिक्षकांना मिळावा. २४ महिन्यांपासून थकीत भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरण्यात यावी.

मोहम्मद इमरानोद्दीन, अध्यक्ष,

न. प. प्राथमिक शिक्षक संघ, अचलपूर.

—————————————

Web Title: Achalpur Municipal Corporation teachers' salaries stagnant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.