अचलपूरमध्ये पाच दिवसांत दगावले १२ कोरोनाग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:13 IST2021-05-16T04:13:02+5:302021-05-16T04:13:02+5:30

फोटो पी १५ लिपणे परतवाडा : अचलपूरमध्ये पाच दिवसांत १२ कोरोनाग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात १५ ...

In Achalpur, 12 corona victims were killed in five days | अचलपूरमध्ये पाच दिवसांत दगावले १२ कोरोनाग्रस्त

अचलपूरमध्ये पाच दिवसांत दगावले १२ कोरोनाग्रस्त

फोटो पी १५ लिपणे

परतवाडा : अचलपूरमध्ये पाच दिवसांत १२ कोरोनाग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात १५ मे मे रोजी एकाच दिवशी पाच मृत्यू झाल्याचे शासकीय आकडेवारीतून अधिकृतपणे पुढे आले आहे. यात सुबोध हायस्कूलचे लिपिक अनिल लिपणे (रा. अचलपूर) यांचादेखील समावेश आहे. अमरावती येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

अनिल लिपणे हे कोरोना संक्रमित निघताच त्यांच्यावर स्थानिक कोविड सेंटरला उपचार केले गेले. प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना अमरावतीच्या कोविड रुग्णालयात दाखल केले गेले. तेथेच त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. काही दिवसांपूर्वी सिटी हायस्कूलचे लिपिक मुकुंद देशपांडे यांचेसुद्धा कोरोनाने उपचारादरम्यान निधन झाले. लिपणे यांच्या मृत्यूने त्या घटनेलाही उजाळा मिळाला.

अचलपूर नगरपालिका क्षेत्रासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाने हाहाकार उडाला आहे. दररोज मृत्यूच्या घटना घडत आहेत. ग्रामीण भागात कोरोना रुग्णांचा आलेख वाढत आहे. यात १४ मे रोजी तालुक्यात १४१ कोरोना रुग्णांची नोंद झाली. यात ग्रामीण भागातील ९३, तर शहरी भागातील ४८ कोरोना रुग्णांचा समावेश आहे. १५ मे रोजी ग्रामीण भागात ४५, तर शहरी भागात ३१ रुग्ण नोंदविले गेले.

सहा गावांनी कोरोना रोखला

या कोरोनाच्या उद्रेकातही अचलपूर पंचायत समिती अंतर्गत पारडी, कुंभी वाघोली, काळवीट, गोंडवाघोली, डोलार (पुनर्वसन) आणि पस्तलाई (पुनर्वसन) या सहा गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले असल्याची माहिती विस्तार अधिकारी एम.एस. कासदेकर यांनी दिली. या सहा गावांमध्ये एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही.

(

Web Title: In Achalpur, 12 corona victims were killed in five days