लग्न टाळणाऱ्या आरोपीला ६ महिने सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:23 AM2021-02-06T04:23:13+5:302021-02-06T04:23:13+5:30

परतवाडा : महिलेला लग्नाचे खोटे आश्वासन देऊन टाळाटाळ केल्याप्रकरणी आरोपीला स्थानिक न्यायालयाने ६ महिने सक्त मजुरी व १० हजार ...

Accused who avoids marriage gets 6 months hard labor | लग्न टाळणाऱ्या आरोपीला ६ महिने सक्तमजुरी

लग्न टाळणाऱ्या आरोपीला ६ महिने सक्तमजुरी

Next

परतवाडा : महिलेला लग्नाचे खोटे आश्वासन देऊन टाळाटाळ केल्याप्रकरणी आरोपीला स्थानिक न्यायालयाने ६ महिने सक्त मजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. प्रफुल्ल दामोधरपंत धर्माळे (रा.चमक, ता. अचलपूर) असे शिक्षाप्राप्त आरोपीचे नाव आहे. अचलपूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश-१ ए.ए.सईद यांच्या न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

विधी सूत्रानुसार, २ ऑक्टोबर २००९ रोजी ही घटना घडली. घटनेवेळी पीडिता तिच्या आजारी बहिणीसोबत अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात गेली असता तेथील वॉर्डबॉय प्रफुल्ल धर्माळे याने तिला लग्नाचे खोटे आमीष देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. नंतर लग्नास नकार दिला. अचलपूर पोलिसांनी त्यावेळी आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३७६, ४१७, ५०६ व अ‍ॅट्राॅसिटीअन्वये गुन्हा दाखल केला. उपविभागीय पोलीस अधिकारी तथा तपासी अधिकारी पी. एस. माहुरे यांनी तपास करून दोषारोप पत्र विद्यमान न्यायालयात दाखल केले.

न्यायालयाने भादंविचे कलम ३७६ मधून आरोपीस मुक्त करून कलम ४१७, ५०६ व अ‍ॅट्राॅसिटीअन्वये आरोपीला दोषी ठरविले. सहा.सरकारी वकील जी. ए. विचोरे यांनी २२ साक्षाीदार तपासले.युक्तीवादाअंती न्यायालयाने आरोपीला कलम ४१७ मध्ये ६ महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. १० हजार रुपये दंड केला तसेच दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त शिक्षा ठोठावली. तसेच पिडीताला २० हजार रुपये नुकसान भरपाईचा आदेश दिला. न दिल्यास ३ महिने अतिरिक्त शिक्षा ठोठावली. सदर प्रकरणात सुरेश गि-हे यांनी पैरवी अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.

Web Title: Accused who avoids marriage gets 6 months hard labor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.