आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:12 IST2021-05-23T04:12:45+5:302021-05-23T04:12:45+5:30

वरूड : तालुक्यातील एका गावात १३ वर्षीय बालिकेवर पाच नराधम युवकांनी जानेवारी महिन्यापासून सतत वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार ...

The accused were remanded in police custody for five days | आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी

आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी

वरूड : तालुक्यातील एका गावात १३ वर्षीय बालिकेवर पाच नराधम युवकांनी जानेवारी महिन्यापासून सतत वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केला. अश्लील फोटो काढून फेसबुकवर व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार केला. याप्रकरणात अटक पाचही आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

पोलीस सूत्रानुसार, सौरभ शेळके, शुभम भोगे, मनोज मानकर, आकाश ठाकरे, प्रीतम अनवाणे अशी आरोपींची नावे आहेत. वरूड पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पाचही आरोपींना न्यायालयात हजर केले. पुढील घटनेचा तपास ठाणेदार प्रदीप चौगावकर, एपीआय सुनील पाटील, हेमंत चौधरी, सारिका बागडे, पोका ललित तायडे, संदीप वंजारी, उमेश ढेवले करीत आहे.

Web Title: The accused were remanded in police custody for five days