वाहनचोरीतील आरोपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:09 IST2021-07-09T04:09:41+5:302021-07-09T04:09:41+5:30

अमरावती: वाहन चोरीतील गुन्ह्यात पोलिसांना हव्या असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली तसेच एका तडीपार आरोपीलासुद्धा पोलिसांनी ताब्यात ...

Accused of vehicle theft arrested | वाहनचोरीतील आरोपी अटकेत

वाहनचोरीतील आरोपी अटकेत

अमरावती: वाहन चोरीतील गुन्ह्यात पोलिसांना हव्या असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली तसेच एका तडीपार आरोपीलासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई ७ जुलै रोजी करण्यात आली.

नील प्रभाकर वानखडे (२५, रा. प्रबुद्धनगर वडाळी) असे आरोपीचे नाव आहे. फ्रेजरपुरा हद्दीत गुन्हेगार चेकिंग करीत असताना आरोपीकडे चोरीचे दुचाकी असल्याची माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने १ ऑक्टोबर २०१६ रोजी चपराशीपुरा चौकाजवळून दुचाकी चोरली असल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून ४० हजार रुपये किमतीची एमएच २७ बीआर ५६४५ क्रमांकाची दुचाकी जप्त करण्यात आली. त्याला फ्रेजरपुरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या मागदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर व पथकाने केली.

बॉक्स:

तडीपार आरोपीला अटक

दोन वर्षांपूर्वी जिल्ह्याबाहेर तडीपार करण्यात आलेला आरोपी शहरात आढळून आला. त्याला गुन्हे शाखेच्या पथकाने पंचशीलनगर (शिराळा) येथून अटक केली. शिवा राजेंद्र तायडे (३२) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध कलम १४२ महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा नोंदविला.

Web Title: Accused of vehicle theft arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.