शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
2
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
3
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
4
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
5
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
6
'माझ्या बायकोला तू पळवून लावलंस!'; रागाच्या भरात भावाने बहिणीची केली निर्घृण हत्या
7
"लग्न नाही, फॅमिली नाही विचार करा...", फुकटचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला जुईचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "अशा माणसांची..."
8
नवरात्रीतील विनायक चतुर्थी २०२५: 'या' ८ राशींसाठी जुळून आले ३ महाशुभ योग; मिळेल विशेष धनलाभ!
9
मुलाला तुरुंगवास, धक्का बसलेल्या वडिलांनी संपवलं जीवन, अंत्यसंस्कारावेळी घडलं असं काही, ७ पोलीस निलंबित
10
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
11
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
12
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
13
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
14
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
15
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...
16
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
17
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
18
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
19
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
20
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू

नांदेड येथील दरोडा प्रकरणातील आरोपींना अमरावतीत पिस्तुलासह अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 15:06 IST

नांदेड शहरातील स्वामी समर्थ ज्वेलर्सवर रिवॉल्वरचा धाक दाखवून दरोडा टाकून पसार झालेल्या तीन आरोपींना अमरावती येथील दसरा मैदानाजवळील झोपडपट्टीतून मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास पिस्तुलासह राजापेठ पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्देराजापेठ पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नांदेड शहरातील स्वामी समर्थ ज्वेलर्सवर रिवॉल्वरचा धाक दाखवून दरोडा टाकून पसार झालेल्या तीन आरोपींना अमरावती येथील दसरा मैदानाजवळील झोपडपट्टीतून मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास पिस्तुलासह राजापेठ पोलिसांनी अटक केली.पोलीससूत्रानुसार, वीरसिंग बसरुसिंग सरदार (२४, रा. बडपुरा, गुरुव्दारा गेटजवळ नांदेड), शुभम ओमप्रकाश जाधव (२२, रा. शिवशक्तीनगर, नांदेड), अनिकेत बालाजी सूर्यवंशी (२०, रा. नवामोंढा साठे चौक दत्तनगर, नांदेड), अशी दरोड्यातील आरोपींची नावे आहेत. राजापेठ पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे २० हजार रुपये किमतीची एक देशी बनावटीची पिस्तुल, बॅरलमध्ये फायर झालेले एक काडतूस, १६०० रुपये किमतीच्या मॅग्झीनमध्ये एक जिवंत काडतूस, तसेच एक लाकडी मूठ असलेले धारदार व टोकदार खंजीर, तसेच विना क्रमांकाची ५० हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त करण्यात आली.

सदर आरोपींनी  मुक्तेश्वर शंकरराव वाहाने (४२, रा. दत्तनगर नांदेड यांचे नांदेड शहरातील स्वामी समर्थ ज्वेलर्समध्ये २९ जुलै २०२० रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास आरोपी वीरसिंग व त्याच्या दोन साथीदारांनी दुचाकीवर येऊन रिव्हॉल्वरच्या धाकावर १५० ग्रॅम सोने, तसेच नगदी १० हजार रुपये असा एकूण ६ लाख ८५ हजारांचा ऐवज जबरीने नेला होता. याप्रकरणी शिवाजीनगर ठाणे नांदेड पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३९४, ३४ सहकलम ४, २५ आर्म अक्टनुसार गुन्हा नोंदविला. पसार आरोपींचा शोध सुरू असतानाच मंगळवारी अमरावती पोलिसांना आरोपी शहरात येत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी