शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

बहुचर्चित प्रतीक्षा मेहेत्रे हत्याकांडातील आरोपीला आजन्म कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 4:13 AM

न्यायालयात दाखल दोषारोपपत्रानुसार, २३ नोव्हेंबर २०१७ रोजी दुपारी १२.३० वाजता प्रतीक्षा मुरलीधर मेहेत्रे (२४, छाबडा प्लॉट) ही मैत्रिणीसोबत दुचाकीने ...

न्यायालयात दाखल दोषारोपपत्रानुसार, २३ नोव्हेंबर २०१७ रोजी दुपारी १२.३० वाजता प्रतीक्षा मुरलीधर मेहेत्रे (२४, छाबडा प्लॉट) ही मैत्रिणीसोबत दुचाकीने साईनगरातील वृंदावन कॉलनीतील ओंकार मंदिरात दर्शनाकरिता गेली होती. दोघीही घरी परत जाताना मार्गात दुचाकीवर आलेल्या राहुल भड याने ओव्हरटेक करीत त्यांना अडविले. यावेळी प्रतीक्षा व राहुल यांच्यात संवाद सुरू होता. दरम्यान, राहुलने अचानक बॅगेतून चाकू काढून प्रतीक्षावर हल्ला केला. ती रक्तबंबाळ अवस्थेत कोसळली. तिच्या मैत्रिणीने मदतीसाठी आरडाओरड केली. तातडीने ओंकार मंदिर गाठून तिने घटनेची माहिती राजेंद्र येते यांना दिली. येते यांनी एका महिलेसह घटनास्थळ गाठून प्रतीक्षाला वाहनाने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी प्रतीक्षाला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच प्रतीक्षाचे वडील इर्विनमध्ये पोहोचले. त्यांनी राजापेठ पोलिसांत तक्रार केली. त्यावरून पोलिसांनी आरोपी राहुल भड याचेविरुध्द हत्येचा गुन्हा नोंदवून शोध सुरू केला. या घटनेनंतर राहुल हा दुचाकीने दिग्रसला गेला. तेथील एका लॉजवर १५ मिनिट थांबला. पार्किंगमध्ये दुचाकी उभी करून, त्याने विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर तो मूर्तिजापूर रेल्वेस्थानकाजवळील रुळावर जाऊन झोपला. दरम्यान राजापेठ पोलीस राहुल भड याच्या शोधात मूर्तिजापूरला पोहोचले. पोलिसांनी पहाटे ४ वाजता राहुल याला रेल्वे रुळावरून अटक केली.

याप्रकरणी तपास अधिकारी पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी तपास पूर्ण करून २० फेब्रुवारी २०१८ रोजी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. सदर प्रकरणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी (फलके) यांच्या न्यायालयात एकूण सात जणांची साक्ष नोंदविली. साक्षीदारांची साक्ष आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायमूर्ती उर्मिला जोशी (फलके) यांच्या न्यायालयाने आरोपी राहुल भड याला आजन्म कारावास, ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ वर्ष अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात जिल्हा सरकारी वकील परीक्षित गणोरकर यांनी प्रभावी युक्तिवाद केला.

---------------------

या निकालाने समाजाला दिशा मिळाली

प्रतीक्षा मेहेत्रे हत्याकांडात तिची मैत्रिण एकमात्र साक्षीदार होती. तिची साक्ष न्यायालयाने ग्राह्य धरली. पोलिसांनी हे प्रकरण सामाजिक उत्तरदायित्व म्हणून हाताळले. आरोपीला आजन्म कारावास ठोठावला. त्यामुळे कोणताही गुन्हा केल्यास काहीच होत नाही, हा समज या निकालाने खोडून काढला. समाजाला या निकालाच्या माध्यमातून नवी दिशा मिळाली, असे सरकारी वकील परीक्षित गणोरकर हे लोकमतशी बोलताना म्हणाले. पीडित कुटुंबांना न्याय मिळाला. पुढे फौजदारी संहितेच्या कलम ३५७ नुसार या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळेल, असे गणोरकर यांनी सांगितले.