खडसे आत्महत्या प्रकरणातील आरोपींना पुण्यात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:15 IST2021-04-23T04:15:02+5:302021-04-23T04:15:02+5:30
तक्रारीवरून पुणे येथील नीलिमा संजय पीटर, ऍंथोनी यादव पवार व संजय एस. पीटर या तिघांविरुद्ध भादंविचे कलम ३०६ व ...

खडसे आत्महत्या प्रकरणातील आरोपींना पुण्यात अटक
तक्रारीवरून पुणे येथील नीलिमा संजय पीटर, ऍंथोनी यादव पवार व संजय एस. पीटर या तिघांविरुद्ध भादंविचे कलम ३०६ व ३४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान पीएसआय हरिहर गोरे व सुनील भालेराव आणि मनोज पंडित यांचेसह महिला पोलिसांचा समावेश असलेले परतवाडा पोलिसांचे पथक २२ एप्रिल रोजी पुण्यात दाखल झाले. तेथून आरोपी असलेल्या त्या तिघांनाही परतवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तिघांनाही सोबत घेऊन पोलीस पथक परतवाडा याकडे निघाले आहे. त्यांना अचलपूर न्यायालयापुढे उभे करून त्यांची पोलीस कोठडी मागितली जाणार आहे. प्रकाश खडसे यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करीत असल्याचे मृत्यूपूर्व लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे. त्यात आरोपी असलेल्या या तिघांनाही पैसे दिल्याचे आणि ते त्यांनी परत न केल्याची सूत्रांची माहिती आहे.