शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
4
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
5
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
6
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
7
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
8
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
9
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
10
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
11
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
12
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
13
पुतीन परतले, पुढे...?
14
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
15
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
17
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
18
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
19
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
20
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

कविठा प्रकरणात आरोपींची हत्येची कबुली, दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 22:41 IST

खुनाचा गुन्हा दाखल, दोघांना अटक

अनिल कडू 

परतवाडा (अमरावती) : अचलपूर तालुक्यातील कविठा बु। गावात राजकीय वैमनस्यातून घडलेल्या हत्याकांडाची कबुली अखेर आरोपींनी परतवाडा पोलिसांकडे दिली. आरोपींची कबुलीनंतर पोलिसांनी भादंविचे कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली आहे. कविता बुद्रुक येथील विजय जाधव (४५) यांचा मृतदेह मंगळवारी पहाटे कविठा ते परतवाडा मार्गावर गावापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर आढळून आला होता. तेव्हापासूनची राजकीय वैमनस्यातून घडलेली हत्या असल्याच्या चर्चेने जोर धरला होता.

परतवाडा पोलिसांनी निखिल सोनार (३०) आणि धीरज जावरकर (२५, रा. कविठा बुद्रुक) यांना चौकशीकरिता ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान या दोघांनीही रात्री उशिरा वैयक्तिक कारणावरून विजयच्या हत्येची कबुली पोलिसांना दिली. यावरून या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली. विजयचा चुलत भाऊ नीलेश जाधव (३७, रा. कवठा बु।) यांनी घटनेच्या अनुषंगाने पोलिसांकडे फिर्याद दिली. आरोपी धीरज जावरकर व निखिल सोनार यांनी संगनमताने विजयला दुचाकीवर बसून नेले. ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्या पॅनेलचा उपसरपंच न झाल्याने मनात द्वेष ठेवून मंगळवारी रात्री साडेबारा वाजताच्या दरम्यान त्यांनी विजयच्या डोक्यावर अवजड वस्तूने वार करून त्याला ठार केल्याचे फिर्यादीने जबाणी रिपोर्टमध्ये म्हटले आहे. घटनेनंतर अचलपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अब्दागिरे, पोलीस निरीक्षक सदानंद मानकर, पोलीस उपनिरीक्षक गोरे यांच्यासह फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. या पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेर्यातील फुटेज तपासले. त्यात आरोपी गिरजा निखिल हे विजयला मोटरसायकलवर घेऊन जात असल्याचे दिसून आले. याच दरम्यान काही लोक त्याठिकाणी बसून असल्याचेही फुटेजमध्ये आढळून आल्यामुळे पोलिसांनी त्यांच्याकडेही चौकशी केली.बंदोबस्त कायमघटनेनंतर गावात दंगा नियंत्रण पथकासह पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. हाच बंदोबस्त दुसर्या दिवशीही कायम होता. गावात सर्वत्र शांतता आहे.

निर्घृण हत्यामृतक विजयची हत्या निर्दयीपणे केल्या केली. यात त्याच्या डोक्यावर गंभीर स्वरुपाचा आघात केल्या गेला. त्याचे डोके, कवटी फुटली. त्यातून मेंदू बाहेर पडून लहान लहान तुकडे घटनास्थळावर विखुरले होते. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त आहे. तसेच या घटनेतील एक आरोपी दारू व्यवसायाशी निगडित असल्याची सूत्रांची माहिती आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गुल्हाने करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकamravati-acअमरावती