विनयभंगाच्या गुह्यातील आरोपीस ३ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:13 IST2021-07-30T04:13:42+5:302021-07-30T04:13:42+5:30
२५ नोव्हेंबर २०२० रोजी एका १७ वर्षीय युवतीने गोपगव्हाण येथील आरोपी आकाश गजानन पवार (१९) विरुद्ध बडनेरा पोलीस ठाण्यात ...

विनयभंगाच्या गुह्यातील आरोपीस ३ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा
२५ नोव्हेंबर २०२० रोजी एका १७ वर्षीय युवतीने गोपगव्हाण येथील आरोपी आकाश गजानन पवार (१९) विरुद्ध बडनेरा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. विनयभंग तसेच फिर्यादीच्या वडिलास ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप होता. तेव्हा आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. तत्काळ त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक पंजाब वंजारी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक शुभांगी गुल्हाने, पोलीस कॉन्स्टेबल विकास यादव, त्रिशूल लांडे सरकारी वकील या सर्वांनी खटल्याची ठोस बाजू न्यायालयासमोर मांडली. त्याआधारे अमरावती न्यायालयाने बुधवार २८ जुलै रोजी आरोपी आकाश पवार याला तीन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.