गांजाप्रकरणातील आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:20 IST2021-05-05T04:20:37+5:302021-05-05T04:20:37+5:30

अमरावती : गांजासह दोन वाहने सोडून पसार झालेल्या दोन आरोपींच्या गुन्हे शाखेने हैद्राबादहून मुसक्या आवळल्या. शेख सलमान शेख अतीक ...

Accused in cannabis case | गांजाप्रकरणातील आरोपी गजाआड

गांजाप्रकरणातील आरोपी गजाआड

अमरावती : गांजासह दोन वाहने सोडून पसार झालेल्या दोन आरोपींच्या गुन्हे शाखेने हैद्राबादहून मुसक्या आवळल्या. शेख सलमान शेख अतीक (२३) व अब्दुल सुफियान ऊर्फ बम्बईया अब्दुल वकील (२३, दोन्ही रा. यास्मीननगर) अशी आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपींना न्यायालयाने ७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ३१ मार्च रोजी नागपुरी गेट हद्दीतील इक्बाल कॉलनीत दोन चारचाकी वाहने बेवारस स्थितीत आढळून आली होती. पोलिसांनी या वाहनांतून ३६६ किलो १०० ग्रॅम गांजासह एकूण ४६ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला होता. पोलिसांनी वाहन क्रमांकाच्या आधारे माहिती निष्पन्न केली. त्यानंतर पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर यांच्या नेतृत्त्वात पोलीस उपनिरीक्षक नरेशकुमार मुंढे, पोलीस हवालदार राजुआप्पा बाहेनकर, फिरोज खान, सतीश देशमुख, दिनेश नांदे, निवृत्ती काकड यांच्या पथकाने हैद्राबादला जाऊन दोन्ही आरोपींना अटक केली.

Web Title: Accused in cannabis case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.