दुचाकी चोरणारा आरोपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:16 IST2021-02-27T04:16:01+5:302021-02-27T04:16:01+5:30
अमरावती : विनाक्रमांकाच्या दुचाकीने फिरत असलेल्या आरोपीला ताब्यात घेऊन विचारणा केली असता, त्याने नागपूर शहर व अमरावती शहरातील ...

दुचाकी चोरणारा आरोपी अटकेत
अमरावती : विनाक्रमांकाच्या दुचाकीने फिरत असलेल्या आरोपीला ताब्यात घेऊन विचारणा केली असता, त्याने नागपूर शहर व अमरावती शहरातील राजापेठ येथून अनेक दुचाकी चोरल्याची कबुली दिली. ही कारवाई चुनाभट्टी परिसरात शहर गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
मोहम्मद अदनान मोहम्मद सादीक (१९, रा. मुजफ्फरपुरा, अमरावती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांचे पथक राजापेठ ठाणे हद्दीत गस्तीवर असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी विनाक्रमांकाची दुचाकी ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली त्यावेळी ही दुचाकी त्याचा मित्र पाजी ऊर्फ राज राजपूत (रा. नागपूर) याच्यासोबत नागपूर येथून चोरल्याची त्याने पोलिसांना सांगितले. त्याबाबत नागपूर येेथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. अदनानला पोलिसी खाक्या दाखविला असता, त्याने व त्याच्या सहकाऱ्याने राजापेठ हद्दीतून आणखीन एक दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या पथकाने केली.