तरुणीचे लैंगिक शोषण, आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:11 IST2020-12-29T04:11:10+5:302020-12-29T04:11:10+5:30

अमरावती : घरात एकटी असलेल्या तरुणीचे लैंगिक शोषण करण्यात आले. ही संतापजनक घटना खोलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २६ डिसेंबर ...

Accused arrested for sexually abusing a young woman | तरुणीचे लैंगिक शोषण, आरोपीस अटक

तरुणीचे लैंगिक शोषण, आरोपीस अटक

अमरावती : घरात एकटी असलेल्या तरुणीचे लैंगिक शोषण करण्यात आले. ही संतापजनक घटना खोलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २६ डिसेंबर रोजी सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

सुरज छगन आठवले (३०, रा ख़ोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित २२ वर्षीय तरुणी २६ डिसेंबर रोजी घरी एकटीच होती. ही संधी साधून सूरजने घरात प्रवेश केला व तिचे लैंगिक शोषण केले. सदर घटनेनंतर पीडित तरुणीने कुटुंबीयांसमोर आपबीती कथन केली. कुटुंबीयांनी खोलापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी सूरजविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

------------------------

Web Title: Accused arrested for sexually abusing a young woman