धामणगावात महिलेवर अत्याचार, आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:23 IST2021-02-18T04:23:29+5:302021-02-18T04:23:29+5:30
अमन अशोक व्यास (३१, रा. पोलीस स्टेशन मागे) असे आरोपीचे नाव आहे. तालुक्यातील एका गावातील महिला बँकेच्या कामानिमित्त मंगळवारी ...

धामणगावात महिलेवर अत्याचार, आरोपीला अटक
अमन अशोक व्यास (३१, रा. पोलीस स्टेशन मागे) असे आरोपीचे नाव आहे. तालुक्यातील एका गावातील महिला बँकेच्या कामानिमित्त मंगळवारी दुपारी ४ वाजता धामणगाव शहरात आली. पाच वाजता काम आटोपल्यावर गावी जाण्यासाठी वाहन नव्हते. त्यामुळे सदर महिला कॉटन मार्केटजवळील बस स्थानकाजवळ रात्री थांबली. अमनने काठीचा धाक दाखवून तिला रात्री ३ वाजता नेहरूनगर भागातील जुन्या बस स्थानक परिसरात नेऊन अत्याचार केला. महिलेने दत्तापूर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. आरोपीचे नाव व पत्ता माहीत असल्याने पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद शेळके यांनी दोन तासांत त्याला अटक केली. त्याने आपल्या कबुली पोलिसांना दिली. त्याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३७६, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दुय्यम ठाणेदार शिवशंकर खेडकर, प्रवीण सोनवणे , बीट जमादार पुंडलिक चव्हाण, सुधीर बावणे सचिन गायधने यांनी कारवाईत सहभाग घेतला.