कारागृहातून फरार आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:16 IST2021-03-09T04:16:33+5:302021-03-09T04:16:33+5:30
बडनेरा : दरोड्याच्या गुन्ह्यात न्यायालयाने कारागृहात रवानगी केलेला १९ वर्षीय आरोपी एक महिन्यापासून फरार होता. बडनेरा पोलिसांना गोपनीय ...

कारागृहातून फरार आरोपी जेरबंद
बडनेरा : दरोड्याच्या गुन्ह्यात न्यायालयाने कारागृहात रवानगी केलेला १९ वर्षीय आरोपी एक महिन्यापासून फरार होता. बडनेरा पोलिसांना गोपनीय माहितीच्या आधारे त्याला सोमवारी चांदूर रेल्वे येथून ताब्यात घेतले.
शेख रशीद शेख भुरू (१९, रा. मिल चाळ) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. बडनेरा पोलिसांनी एक महिन्यापूर्वी दरोड्याच्या गुन्ह्यात त्याला अटक केली. न्यायालयाच्या आदेशाने त्याला अस्थायी कारागृहात ठेवण्यात आले. तेथून पसार झाल्यानंतर पोलीस त्याच्या शोधात होती. अस्थायी कारागृह हे फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने तेथे गुन्हादेखील दाखल झाला होता. बडनेरा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सदर फरार आरोपीला चांदूर रेल्वे येथून ताब्यात घेण्यात आले.
पोलीस निरीक्षक बबन पुसाटे यांच्या मार्गदर्शनात डीबी स्कॉडचे अहमद अली, अभिजित गावंडे , विकी नशीबकर, विनोद कनोजिया यांनी शेख रशीदला पकडले.