वित्त विभागाने मागितला जमा-खर्चाचा हिशोब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:20 IST2021-02-23T04:20:04+5:302021-02-23T04:20:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : आगामी आर्थिक वित्तीय वर्ष २०२०-२१ संपण्यासाठी आता अवघा एक महिना शिल्लक आहे. त्यामुळे ...

Accounts Receivable and Expenditure requested by the Finance Department | वित्त विभागाने मागितला जमा-खर्चाचा हिशोब

वित्त विभागाने मागितला जमा-खर्चाचा हिशोब

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : आगामी आर्थिक वित्तीय वर्ष २०२०-२१ संपण्यासाठी आता अवघा एक महिना शिल्लक आहे. त्यामुळे जिल्हा परिषद वित्त विभागाने जिल्हा निधीतून विविध विभागांना उपलब्ध करून दिलेल्या निधीच्या खर्चाचा विस्तृत लेखाजोखा मागवला आहे. ही माहिती प्राप्त झाल्यानंतर आगामी सन २०२१-२२च्या बजेटची प्राथमिक तयारी करण्यासाठी वित्त विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत.

जिल्हा परिषदेला विविध माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या उत्पन्नावर आधारित बजेट तयार केले जाते. यामध्ये शासनाच्या सूचनेप्रमाणे समाजकल्याणकरिता २० टक्के, महिला व बालकल्याणसाठी १० टक्के, दिव्यांग व शाळा दुरूस्तीसाठी प्रत्येकी ५ टक्के आणि देखभाल, दुरूस्तीसाठी २० टक्के असा ६० टक्के निधी राखीव ठेवला जातो. त्यामुळे उर्वरित ४० टक्के निधीमधून जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व विकासकामे तसेच अन्य प्रशासकीय कामकाजाकरिता आर्थिक तरतूद केली जाते. त्यानुसार जिल्हा परिषदेने सन २०२०-२१ या वर्षातील बजेटमधून विविध विभागांना विकासकामे, योजनांकरिता उपलब्ध करून दिलेल्या निधीत संबंधित विभागाकडून किती रक्कम खर्च झाली आणि किती शिल्लक आहे, याची विस्तृत माहिती सादर करण्याचे पत्र जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे यांनी सर्व विभागप्रमुखांना दिले असून, याबाबत माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

बॉक्स

२७ मार्चपूर्वी होणार बजेट

दरवर्षी जिल्हा परिषदेचे बजेट तयार केले जाते. त्यानुसार सन २०२१-२२ या आथिक वर्षाचे बजेट तयार केले जाणार आहे. शासनाच्या सूचनेप्रमाणे जिल्हा परिषदेचे बजेट २७ मार्चपूर्वी मंजूर करणे आवश्यक आहे. त्यानुसार आगामी बजेट २७ मार्चपूर्वी मंजूर केले जाणार असल्याचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे यांनी सांगितले.

Web Title: Accounts Receivable and Expenditure requested by the Finance Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.