जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या २८ लाखांवर
By Admin | Updated: May 17, 2014 23:10 IST2014-05-17T23:10:45+5:302014-05-17T23:10:45+5:30
नवीन जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या २८,८८,४४५ एवढी आहे. यामध्ये १४,८0,७६८ पुरूष व १४,0७,६७७ महिला आहेत. अनुसूचित जातीमध्ये २,५९,३९८ पुरूष व

जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या २८ लाखांवर
>अमरावती : नवीन जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या २८,८८,४४५ एवढी आहे. यामध्ये १४,८0,७६८ पुरूष व १४,0७,६७७ महिला आहेत. अनुसूचित जातीमध्ये २,५९,३९८ पुरूष व २,४६,९७६ महिलांचा समावेश आहे. अनुसूचित जमातीमध्ये २,0५,८३४ पुरुष व १,९८,२९४ महिला आहेत. तसेच ३७ व्यक्ती ‘इतर’मध्ये समाविष्ट आहेत. या जनगणनेत जिल्ह्यात ६,४४,४५१ कुटुंब आहेत.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची लोकसंख्या १८,५१,१३४ आहे. यामध्ये ९,५१,६८३ पुरुष व ८,९९,४३९ महिला आहेत. यामध्ये १२ ‘इतर’ व्यक्ती आहे; 0 ते ६ वर्ष वयोगटातील १,९७,१0१ संख्येपैकी १,0१,७७३ मुले व ९५,३२८ मुली आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १४,२0,५४२ नागरीक सुशिक्षित आहेत. यामध्ये ७,७६,५२७ पुरूष व ६,४४,१११ महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यातील शहरी भागात १0,३६,६९२ लोकसंख्या आहे. यामध्ये ५,३१,१२५ पुरूष व ५,0५,५४२ महिला आहेत. 0 ते ६ वयोगटात १,0२,७0५ लोकसंख्या आहे. यात ५३,७९९ मुले व ४८,९0६ मुली आहेत. शहरी भागात ८,६२,७0८ साक्षर नागरिक आहेत. यामध्ये ४,५३,८४९ पुरूष व ४,0८,८४३ महिला आहेत.
जिल्ह्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. विस्तारीत जाणार्या सीमारेषा व नागरी वस्त्यांमध्ये झालेल्या वाढीवरून वाढत्या लोकसंख्येची कल्पना येते. जनगणनेवरून वाढलेल्या लोकसंख्येची आकडेवारी स्पष्ट झाली आहे. ग्रामीण भागातही लोकसंख्येचा विस्तार झाला आहे. जनगणनेवरून स्त्री-पुरूषांच्या संख्येतील तफावतही स्पष्ट झाली आहे.(प्रतिनिधी)