'स्पिडब्रेकर'वर दोन कारमध्ये अपघात
By Admin | Updated: October 29, 2016 00:45 IST2016-10-29T00:11:13+5:302016-10-29T00:45:10+5:30
येथील स्मशानभूमीजवळ एकाच दिशेने येणाऱ्या दोन कारमध्ये अपघात घडला.

'स्पिडब्रेकर'वर दोन कारमध्ये अपघात
किरकोळ जखमी : मागून दिली जबर धडक, मोझरीतील घटना
गुरुकुंज (मोझरी) : येथील स्मशानभूमीजवळ एकाच दिशेने येणाऱ्या दोन कारमध्ये अपघात घडला. यात सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही. भरधाव कार अन्य कारला मागून धडकली. दोन्ही कारमध्ये लहान मुलांसह महिलाही प्रवास करीत होत्या. ही घटना शुक्रवारी दुपारी २.४५ वाजता घडली.
सविस्तर माहितीनुसार भंडारा येथून गुरूकुंज येथे वैद्यकीय विद्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी एम.एच.३६/२७५ क्रमांकाच्या कारने प्रवीण झाडे हे सपत्निक येत होते. याचवेळी त्यांच्या पुढे एम.एच. ०५/१४८० क्रमांकाची कार नागपूरवरून अमरावतीच्या दिशेने जात होती. या कारमध्ये महिला आणि चिमुकली होती. या कारने झाडे यांच्या कारला मागून जोरदार धडक दिली. अपघातात कारचे मागचे चाक तुटले. धडक देणाऱ्या कारची देखील हानी झाली. सुदैवाने अपघातात कोणतीही प्राणहानी झाली नाही. घटनेच्या पुढील तपासकरीता तिवसा पोलीस घटनास्थळी हजर झाले होते. बघ्यांची गर्दी झाली होती. (वार्ताहर)