टॅ्रक्टरचा पाठलाग करताना युवकाचा अपघाती मृत्यू
By Admin | Updated: May 13, 2016 00:12 IST2016-05-13T00:12:30+5:302016-05-13T00:12:30+5:30
ट्रॅक्टरचा धक्का लागल्याने दुचाकीवरील युवकांनी जाब विचारण्याकरिता टॅ्रक्टरचा पाठलाग केला. यामध्ये दुचाकीवरील युवक ट्रॅक्टरच्या चाकात पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर दोन युवक जखमी झाले.

टॅ्रक्टरचा पाठलाग करताना युवकाचा अपघाती मृत्यू
दोन जखमी : पाठलाग करणे जीवावर बेतले
वरूड : ट्रॅक्टरचा धक्का लागल्याने दुचाकीवरील युवकांनी जाब विचारण्याकरिता टॅ्रक्टरचा पाठलाग केला. यामध्ये दुचाकीवरील युवक ट्रॅक्टरच्या चाकात पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर दोन युवक जखमी झाले. घटना ९ मे रोजी रात्री ९.३० वाजताच्या दरम्यान इंदिरा चौकात घडली. वरूड पोलिसांनी पंचनामा करुन दोन्ही जखमींना अमरावती येथे उपचाराकरिता रवाना केले. टॅ्रक्टरने धक्का दिला म्हणून पाठलाग करणे जिवावर बेतल्याची घटनास्थळी चर्चा होती.
प्राप्त माहितीनुसार, अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव बंटी उर्फ कुलदीप बाबाराव फुले (२१रा. रोशनखेडा) असे आहे. तर संजय सुभाष तिडगाम (३२,रा.शहापूर पूनर्वसन), विनोद पोलजी कवडे (२८ रा.मालेगाव) अशी जखमींची नावे आहेत. युवक दुचाकीने स्थानिक इंदिरा चौकात आले होते. जवळून जाणाऱ्या ट्रॅक्टरने धक्का दिल्याने दोघे खाली पडून जखमी झाले. प्रत्यक्षदर्शी रोशनखेडा येथील युवक करण फुले, कुलदीप फुले यांच्यासह अन्य काही युवकांनी ट्रॅक्टरचा पाठलाग केला. पाठलाग करून त्यांनी विष्णू मंगल कार्यालयाजवळ वळण रस्त्यावर ट्रॅक्टरला थांबविण्याचा प्रयत्न केला असता कुलदीप उर्फ बंटी बाबाराव फुले चाकात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी जखमीला ग्रामीण रूग्णालयात दाखल करुन पुढील उपचाराकरीता त्यांना अमरावतीला पाठविण्यात आले. घटनेची फिर्याद करण फुले यांनी पोलीस स्टशेनमध्ये दिल्यावरुन पोलिसांनी टॅ्रक्टर चालकाविरुध्द भादंविच्या कलम २७९, ३३७,३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास ठाणेदार अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सुबोध वंजारी, जमादार सोमेश्वर कपाटे, गोपाल सोळंके, विक्रांत कोंडे, नितेश वाघ, प्रशांत देशमुख करीत आहेत.