सायबर सेलच्या पोलीस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू
By Admin | Updated: November 30, 2015 00:32 IST2015-11-30T00:32:09+5:302015-11-30T00:32:09+5:30
गुन्हेविषयक प्रशिक्षणाकरिता गेलेल्या सायबर सेलचे पोलीस कर्मचारी विजय मधुकर काकड (३७, रा.कारंजा लाड, ह.मु. कठोरा) यांचा नाशिक जिल्ह्यातील सिन्नरजवळ...

सायबर सेलच्या पोलीस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू
नाशिक जिल्ह्यातील घटना : पोलीस आयुक्तालयात शोक
अमरावती : गुन्हेविषयक प्रशिक्षणाकरिता गेलेल्या सायबर सेलचे पोलीस कर्मचारी विजय मधुकर काकड (३७, रा.कारंजा लाड, ह.मु. कठोरा) यांचा नाशिक जिल्ह्यातील सिन्नरजवळ शनिवारी रात्री अपघाती मृत्यू झाला. या घटनेमुळे पोलीस आयुक्तालयात शोककळा पसरली आहे.
गुन्हे शाखेच्या सायबर सेलमधील पोलीस कर्मचारी चैतन्य रोकडे, सुभाष पाटील व विजय काकड हे तिघेही १६ नोव्हेंबर रोजी नाशिकला प्रशिक्षणाकरिता गेले होते. दरम्यान शनिवार व रविवारी सुटी असल्यामुळे ते देवदर्शनासाठी जात होते. त्यावेळी त्यांच्यासोबत नांदेडच्या शिवदास बुडूक व पुंडलिक धुमलवाड हे दोन पोलीस कर्मचारीही होते. पाचही जण चारचाकी वाहन एमएच २७-बी-४०३० ने देवदर्शनाकरिता शनिवारी दुपारी २.३० वाजता निघाले. त्यांनी नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर देवस्थानात दर्शन घेतल्यानंतर ते वाहनाने शिर्डीकरिता जात होते. दरम्यान, नाशिक ते शिर्डी मार्गावरील सिन्नरजवळ स्टिअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने वाहन दुभाजकावर आदळून उलटले.