वस्त्रोद्योग महामंडळ अध्यक्षांच्या वाहनाला अपघात

By Admin | Updated: August 11, 2015 00:29 IST2015-08-11T00:29:56+5:302015-08-11T00:29:56+5:30

तालुक्यातील खानापूर येथे राज्यव्यापी शेतकरी बचाव आंदोलन आणि शेतकरी कृतज्ञता सोहळयाला उपस्थित राहाण्यासाठी जाणाऱ्या वस्त्रोद्योग महामंडळाच्या अध्यक्षांच्या वाहनाला अपघात झाला.

Accident of the vehicle of the Chairman of Textile Corporation | वस्त्रोद्योग महामंडळ अध्यक्षांच्या वाहनाला अपघात

वस्त्रोद्योग महामंडळ अध्यक्षांच्या वाहनाला अपघात

वरूड तालुक्यातील घटना : पाठोपाठ चार गाड्या एकमेकांवर आदळल्या
वरूड : तालुक्यातील खानापूर येथे राज्यव्यापी शेतकरी बचाव आंदोलन आणि शेतकरी कृतज्ञता सोहळयाला उपस्थित राहाण्यासाठी जाणाऱ्या वस्त्रोद्योग महामंडळाच्या अध्यक्षांच्या वाहनाला अपघात झाला.
स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खा. राजू शेट्टी, वस्त्रोउद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यासह नेत्यांच्या वाहनाचा ताफा खानापूरकडे जात होते. अचानक स्थानिक बसस्थानक परिसरात अज्ञात कार चालकाने वाहन थांबविल्याने पाठीमागे असलेला वाहनाचा ताफा अनियंत्रित होवून एकमेकांवर आदळला. अपघात किरकोळ असल्यामुळे कुणालाही इजा झाली. मात्र, गाड्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. खानापूर येथून स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या राज्यव्यापी शेतकरी बचाव अभियानाची सुरुवात होणार होती. याकरीता राज्यव्यापी शेतकरी बचाव आंदोलन आणि शेतकरी कृतज्ञता सोहळ्याला स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी, वस्त्रोउद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, रासपचे अध्यक्ष आ. महादेव जानकर, शिवसंग्रामचे अध्यक्ष आ. विनायक मेटकर, गजानन अहमदाबादकर, एकनाथ दुधे यांच्यासह कार्यकर्त्यांचा ताफा विश्रामगृहावरुन खानापूरकड ेनिघाला होता. परंतु बसस्थानकापुढे अज्ञात कारचालकाने ब्रेक लावल्याने मागून येणाऱ्या नेत्यांच्या ताफ्यातील वाहने अनियंत्रित होवून एकमेकांवर आदळली. ही घटना ररिवारला दुपारी चार वाजता दरम्यान घडली. यामध्ये एम.एच ३१डी.व्हि.९३९९ ,एम.एच.३० एल ६८९३,एम.एच.२९ एबी ७४२२,सह आणखी वाहनांचा समावेश होता. सुदैवाने प्राणहाणी झाली नाही. मात्र, लाखो रुपयाचे वाहनांचे नुकसान झाले.
अज्ञात वाहनचालक मात्र वाहनासह घटनास्थळावरुन पळूुन गेल्याने त्याचा शोध लागला नाही. परंतु पोलीसांची यावेळी चांगलीच दमछाक झाली होती. दुसऱ्या वाहनाने सदर नेते पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले. (तालुका प्रतिनीधी)

Web Title: Accident of the vehicle of the Chairman of Textile Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.