लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : पर्यटन स्थळावर आलेल्या दर्यापूर येथील पर्यटकांच्या वाहनाला मालवीय पॉइंटवर रविवारी अपघात झाला. यात सात जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.सुरेश मानकर (५०), सोपान राणे (५२), असलम खान (३०), अब्दुल रशीद (२६), साई अहमद (३०) एजाज खान (२९), अन्वर अहमद (३०, सर्व रा. दर्यापूर), अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्या हाता-पायावर, डोके आणि खांद्याला गंभीर मार लागल्याने त्यांना इर्विनला हलविले आहे. शनिवार-रविवारी चिखलदऱ्यात पर्यटकांनी गर्दी केली होती. यातच भरधाव वाहन पुलाखाली कोसळल्याने पर्यटक गंभीर जखमी झालेत.भरधाव वाहनांची स्पर्धाचिखलदरा पर्यटन स्थळावर दोन दिवस मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी उसळली होती. त्यावर पोलिसांचा कुठलाच अंकुश दिसून आला नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात घाट वळण्याच्या रस्त्यांसह पॉइंटवर हौसी पर्यटक बेदरकारपणे वाहने चालवताना दिसून आलेत. अपघातग्रस्त वाहन भरधाव वेगात असल्याने पुलाखाली कोसळले.
पर्यटकांच्या वाहनाला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 01:30 IST
पर्यटन स्थळावर आलेल्या दर्यापूर येथील पर्यटकांच्या वाहनाला मालवीय पॉइंटवर रविवारी अपघात झाला. यात सात जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
पर्यटकांच्या वाहनाला अपघात
ठळक मुद्देचिखलदरा येथील घटना : दर्यापूर येथील सात जण गंभीर