बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:13 IST2021-03-05T04:13:18+5:302021-03-05T04:13:18+5:30
मोर्शी : एसटी बसला ओव्हरटेक करत असताना झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वार जबर जखमी झाले. ३ मार्च रोजी सायंकाळी ...

बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात अपघात
मोर्शी : एसटी बसला ओव्हरटेक करत असताना झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वार जबर जखमी झाले. ३ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजताचे सुमारास भाईपूर येथे हा अपघात घडला. जखमींना मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
राजूरवाडी येथील पीयूष राऊत (२५) व मंगेश परतेती (२५) हे दोघे एमएच २८ ए ५७१ या दुचाकीने राजूरवाडी मोर्शी मार्गे जामगाव खडका येथे दर्ग्यावर दर्शनासाठी गेले होते. तिथून दर्शन घेऊन परत येताना भाईपूरजवळ त्यांनी समोर जाणाऱ्या एसटी बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते एसटी बसवर धडकून दुचाकीसह फेकले गेले. या अपघातात पीयूष राऊत याचा पाय मांडीपासून पूर्णत: निकामी झाला. लगेच या दोघांना उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. परिस्थितीचे गांभीर्य पाहून पीयूषला पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले. मंगेश परतेकी याचा उपचार मोर्शी उपजिल्हा रुग्णालय सुरू आहे.