शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बडनेरानजीक अपघात; तीन ठार ! तिघेही अमरावतीचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 11:13 IST

Amravati : एक्स्प्रेस हायवेवर ट्रकची कारला धडक

लोकमत न्यूज नेटवर्क बडनेरा : एक्स्प्रेस हायवेवरील वरुडानजीकच्या उड्डाणपुलावर शनिवारी मध्यरात्रीनंतर २ च्या सुमारास झालेल्या अपघातात चारचाकी वाहनातील तिघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ट्रकचे बफर अपघातग्रस्त वाहनात फसले होते. बडनेरा पोलिसांनी अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस सूत्रांनुसार, ऋषिकेश ज्ञानेश्वर कराळे (२८), अजय रामखिलावन यादव (३२, दोघेही रा. अर्जुननगर, अमरावती), रजत मेश्राम (३२, रा. माहुली जहागीर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहे. सुमित लक्ष्मण गोंदूरवार (३०, रा. अर्जुननगर, अमरावती) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. हे चौघेही एमएच २७ डीएल ६६९९ क्रमांकाच्या कारने लोणी गावाकडून अमरावतीच्या दिशेने एक्स्प्रेस हायवेवरून येत होते. वरुडा गावानजीक हा अपघात घडला. परिसरातील लोकांनी अपघाताची माहिती बडनेरा पोलिसांना दिली यानंतर तत्काळ पोलिस व अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाले. दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. चौघेही परस्परांच्या ओळखीतील होते.

चारचाकी फेकली गेली दुसऱ्या बाजूला अपघातग्रस्त वाहन रस्त्याचे दुभाजक ओलांडून दुसऱ्या बाजूने फेकले गेले. चालक तसेच बाजूला बसलेला युवक केबिनमध्ये फसले होते. पोलिसांनी रक्तबंबाळ झालेल्या या दोघांना बाहेर काढले. सहायक पोलिस निरीक्षक संदीप हिवाळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा नोंदविला.

ट्रकचे बफर फसले अपघात चारचाकीच्या समोरच्या भागात नेमप्लेट असलेले बफर फसले होते. हे बफर दुसऱ्या वाहनाचे असल्याचे लक्षात आल्यानंतर बडनेरा पोलिसांनी नांदगाव पेठ टोल नाक्यावर सीसीटीव्ही तपासले तेव्हा ते बफर एका ट्रकचे असल्याचे निदर्शनास आले 

टॅग्स :AccidentअपघातAmravatiअमरावती