दुचाकीला कट मारल्याने अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:27 IST2021-02-05T05:27:14+5:302021-02-05T05:27:14+5:30

अमरावती : एका दुचाकीला अन्य दुचाकीने कट मारल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना रामपुरी कॅम्पमध्ये मंगळवारी घडली. फिर्यादी रामचंद्र फेरूमल ...

Accident due to cut on the bike | दुचाकीला कट मारल्याने अपघात

दुचाकीला कट मारल्याने अपघात

अमरावती : एका दुचाकीला अन्य दुचाकीने कट मारल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना रामपुरी कॅम्पमध्ये मंगळवारी घडली. फिर्यादी रामचंद्र फेरूमल अहुजा (४८, रा. रामपुरी कॅम्प) यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकावर गुन्हा नोंदविला.

-----------------------------------------------------

बेनोडा येथे जुगार पकडला

अमरावती : फ्रेजरपुरा पोलिसांनी गोंडपुरा बेनोडा येथे धाड टाकून जुगाराचे साहित्य व मोबाईल असा एकूण १०२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी करण्यात आली. आरोपी गोपाल वामनराव बाजड, बाबुलाल हेमराज मेंधाने (दोन्ही रा. बेनोडा अमरावती) असे आरोपीचे नाव आहे.

---------------------------------------

शिवाजी चौकात अवैध दारू जप्त

अमरावती : बडनेरा पोलिसांनी येथील शिवाजी चौकात कारवाई करून १,९६० रुपयांची अवैध दारू बुधवारी जप्त केली. आरोपी प्रमोेद दत्तुआप्पा चिकटे (४२, रा. तलेगाव आष्टी जि. वर्धा) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

Web Title: Accident due to cut on the bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.