भिष्णुर फाट्यावर अपघात; मुलगी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:23 IST2021-02-05T05:23:08+5:302021-02-05T05:23:08+5:30
फोटो पी ३१ भिष्णुर तिवसा : अमरावती - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तळेगाव श्यामजीपंत पोलीस ठाण्याच्या हद्दीत भिष्णुर फाट्यानजीक एका ...

भिष्णुर फाट्यावर अपघात; मुलगी ठार
फोटो पी ३१ भिष्णुर
तिवसा : अमरावती - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तळेगाव श्यामजीपंत पोलीस ठाण्याच्या हद्दीत भिष्णुर फाट्यानजीक एका दुचाकीला अपघात होऊन शाळकरी मुलगी जागीच ठार झाली. तर दोन जण जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी ४ वाजता घडली. रूपाली योगेश लसनकर (१३, रा. खापरखेडा, जि. नागपूर) असे मृत मुलीचे नाव आहे.
जखमीमध्ये मंगेश उद्धव लसनकर (३५) व बेबी उद्धव लसनकर (५५, दोघेही रा. खापरखेडा) यांचा समावेश आहे. एमएच ४० एएन ५७८१ या दुचाकीने लसनकर कुटुंब खापरखेडाहून अचलपूर येथे जात होते. भिष्णुर फाट्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या खाली उतरली. त्यामुळे अपघात झाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तळेगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली व जखमींना तिवसा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तळेगाव श्यामजीपंत ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पवन भांबुरकर, जमादार गजानन बावणे, अमोल इंगोले, रोशन करनुके, गृह रक्षक दलाचे मुकद्दर पठाण यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
-----------------