हाताच्या स्वच्छतेनंतरच प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:00 IST2020-03-25T05:00:00+5:302020-03-25T05:00:26+5:30
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सामान्य प्रशासन विभागाला तातडीने उपाययोजना करण्याचे फर्मान सोडले. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने पदाधिकाऱ्यांच्या दालनासमोर उपलब्ध करून दिलेल्या हँडवॉश सुविधेनंतर आता प्रशासनाने कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटायझर व हात धुण्यासाठी साबण उपलब्ध करून दिले आहे.

हाताच्या स्वच्छतेनंतरच प्रवेश
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : हात स्वच्छ धुवा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे केले जात आहे. अशाच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतागृहांमध्ये साबण नसल्याचा प्रकार चव्हाट्यावर येताच प्रशासन खडबडून जागे झाले.
याची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सामान्य प्रशासन विभागाला तातडीने उपाययोजना करण्याचे फर्मान सोडले. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने पदाधिकाऱ्यांच्या दालनासमोर उपलब्ध करून दिलेल्या हँडवॉश सुविधेनंतर आता प्रशासनाने कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटायझर व हात धुण्यासाठी साबण उपलब्ध करून दिले आहे.
विशेष म्हणजे, मुख्यालयातील विविध विभागांच्या प्रवेशद्वारावरच ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या ठिकाणी कर्मचाऱ्यांना हात धुतल्यानंतर कार्यालयात प्रवेश दिला जात आहे, सोबत बाहेरून शासकीय कामांचे टपाल घेऊन येणाºया कर्मचाºयाने हात धुतल्याशिवाय ते स्वीकारले जात नसल्याचे चित्र शुक्रवारी जिल्हा परिषदेत दिसून आले.
ग्रामीण भागातील विविध कामांसाठी मोठ्या संख्येने नागरिक जिल्हा परिषद येतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. या आजाराची प्रादुर्भाव टाळण्यासाठी आता जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने प्रतिबंधक उपाय लागू केले आहेत. याकरिता स्वच्छतागृहांमध्ये साबण व सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासनाने उचललेल्या पावलानंतर कर्मचाºयांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
मुख्यालय परिसरातील सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाºयांसाठी नऊ ठिकाणी हँडवॉशची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय स्वच्छतागृहाच्या ठिकाणीही ही सोय आहे.
- तुकाराम टेकाळे,
डेप्युटी सीईओ, सामान्य प्रशासन