तथागताने दिलेला विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारा

By Admin | Updated: February 26, 2016 00:28 IST2016-02-26T00:28:13+5:302016-02-26T00:28:13+5:30

तथागत भगवान गौतम बुध्दांनी समाजाला दिलेला बौध्द धर्म हा विज्ञानवादी धर्म असून हा विज्ञानवादी दृष्टिकोन समाजाने स्वीकारावा, ....

Accept the tenet of science | तथागताने दिलेला विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारा

तथागताने दिलेला विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारा

जगताप : मालखेड येथे बुद्धविहाराचे लोकार्पण
चांदूररेल्वे : तथागत भगवान गौतम बुध्दांनी समाजाला दिलेला बौध्द धर्म हा विज्ञानवादी धर्म असून हा विज्ञानवादी दृष्टिकोन समाजाने स्वीकारावा, असे प्रतिपादन आ. वीरेंद्र जगताप यांनी केले. स्थानिक के.एन. फाऊंडेशनच्या स्व उभारणीतून साकारलेल्या बुध्दविहाराचे व मीराबाई पाटील ग्रंथालयाच्या लोकार्पणाप्रसंगी ते बोेलत होते.
भगवान बुध्दांचेच विचार आज जगाला वाचवू शकतात. त्यामुळे या विचारांचे अनुकरण व्हायला हवे, असे जगताप पुढे म्हणाले. यावेळी अध्यक्षस्थानी भदन्त सुमेध बोधी महाथेरो होते. तर प्रमुख अतिथी म्हणून आंबेडकरी विचारवंत जे.बी.इंगोले, पीरिपाचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष चरणदास इंगोले, माजी पंचायत समिती सभापती गणेश आरेकर, नगरसेवक बंडू आठवले, सरपंच अशोेक रोडगे, जि.प. सदस्य ज्योती राऊत, उत्तम भैसने, के.एन. फाऊंडेशनचे अरूण पाटील उपस्थित होते. के.एन. फाऊंडेशनच्या माध्यमातून स्वखर्चाने हे बौध्दविहार बांधण्यात आले आहे.
संचालन संघपाल सरदार, प्रास्ताविक भोसले यांनी केले. कार्यक्रमासाठी मंदा पाटील, मनोहर वानखडे, नलू वावरे, जानराव मेश्राम, पद्मा पाटील, अरूण पाटील, सुप्रिया बोदडे, यांनी प्रयत्न केले. अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Accept the tenet of science

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.