लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खासगी वाहतुकीला टक्कर देण्यासाठी एसटी महामंडळच्या ताफ्यात शिवशाही बसेस आणल्या आहेत. परंतु सुरुवातीपासून शिवशाही बसमधील सुरक्षितेबाबत प्रश्नचिन्ह लागले आहे. अशातच आता ऐन उन्हाळ्यात जादा पैसे मोजूनही बहुतांश शिवशाहीतील वातानुकूलित यंत्रणा बंद राहत आहेत. त्यामुळे प्रवासी घामाघूम होत आहेत. खासगी बसेसमध्ये वातानुकूलित यंत्रणा, स्वच्छता यासह इतर सोयी सुविधा मिळतात. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवाशांचा त्याकडे अधिक ओढा असतो. त्यामुळे प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी महामंडळाने आपल्या ताफ्यात शिवशाही बसेस दाखल केल्या. साधारण बसेसपेक्षा या शिवशाहीचे भाडे अधिक असले तरी प्रवाशांकडून त्याला पसंती दिली जात आहे. या बसेसमध्ये गैरसोय वाढली आहे.
एसी बंद पडण्याचे प्रकारतापमान सध्या ४१ अंशांवर गेले आहे. त्यामुळे जादा पैसे मोजण्याची तयारी दर्शवित प्रवासी वातानुकूलित असलेल्या शिवशाहीची प्रवासासाठी निवड करतात. परंतु प्रवासात अनेकवेळा बसमधील वातानुकूलित यंत्रणा बंद पडत आहे.
अपघातामुळे बदनामशिवशाही बसेसचे मागील काही वर्षांत अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे वाढत्या अपघातांमुळे शिवशाही बस प्रवाशांच्या पसंती कमी होत आहे.
जिल्ह्यात ३९ शिवशाहीजिल्ह्यात अमरावती आगारात १३, बडनेरा ११, परतवाडा ५, वरूड ५ आणि दर्यापूर ५ अशा एकूण ३९ शिवशाही बसेस आहेत.
"विभागात ३९ शिवशाही बसेस आहेत. यापैकी ३० बसेस सध्या प्रवासी सेवेत आहेत."- स्वप्निल धनाड, यंत्र अभियंता, रापम
"उन्हाचा पारा वाढल्यामुळे वातानुकूलित शिवशाहीच्या प्रवासात अनेकवेळा वातानुकूलित यंत्रणा बंद पडली होती."- संजय मानकर, प्रवासी
"शिवशाही बसेस खिळखिळ्या झाल्या आहेत. त्यामुळे त्रास होतो. त्यामुळे शिवशाही बसेसमध्ये जादा पैसे देऊन सोईसुविधा मात्र मिळत नाहीत."- मनीष उके, प्रवासी