वरूड तहसील कार्यालयातील २२ अधिकारी-कर्मचारी गैरहजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:24 IST2021-02-05T05:24:13+5:302021-02-05T05:24:13+5:30
वरूड : शासनाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोमवार ते शुक्रवार असा पाच दिवसांचा आठवडा केला. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ...

वरूड तहसील कार्यालयातील २२ अधिकारी-कर्मचारी गैरहजर
वरूड : शासनाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोमवार ते शुक्रवार असा पाच दिवसांचा आठवडा केला. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकाळी ९.४५ वाजता कार्यालयात पोहोचणे अपेक्षित आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार देवेंद्र भुयार यांनी सोमवारी वरूड तहसील कार्यालयात सकाळी १० वाजता आकस्मिक भेट दिली. त्यावेळी ३४ पैकी तब्बल २२ कर्मचारी गैरहजर आढळले. त्यात चार नायब तहसीलदार, तीन अव्वल कारकून, नऊ महसूल सहायक, पाच शिपायांचा समावेश आहे. त्यासाठी उशिरा येणाऱ्या व गैरहजर अधिकारी-कर्मचाऱ्यांविरूद्ध तात्काळ कारवाईची सूचना आमदार देवेंद्र भुयार यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना दिली. कर्मचारी खरेच वेळेवर येतात का, याची तपासणी सोमवारी आमदार देवेंद्र भुयार यांनी केली. यात बहुतांश कर्मचारी वेळेत हजर नव्हते. काही कर्मचारी सवयीने उशिरा आल्याचे दिसून आले. कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नोंदी घेण्यात आल्या.