मामानेच केले भाचीचे अपहरण

By Admin | Updated: September 9, 2016 00:32 IST2016-09-09T00:32:40+5:302016-09-09T00:32:40+5:30

तालुक्यातील पांढरी खानमपूरच्या समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातून अकोला येथील एका युवकाने सख्ख्या भाचीचे अपहरण केले.

Abduction of uncle | मामानेच केले भाचीचे अपहरण

मामानेच केले भाचीचे अपहरण

पांढरीची घटना :आरोपी अकोलखेडहून गजाआड
अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील पांढरी खानमपूरच्या समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातून अकोला येथील एका युवकाने सख्ख्या भाचीचे अपहरण केले. तिला अकोट तालुक्यातील अकोलखेड शेत शिवारात नेऊन तिच्यावर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. महत्प्रयासाने ती मामाच्या तावडीतून सुटून तुरीच्या शेतात लपल्याने पुढील अनर्थ टळला.
अकोलखेडच्या गावकऱ्यांनी आरोपीला पकडून व मुलीला शोधून अकोट पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजता घडली. अकोट पोलिसांनी आरोपी राजू आठवले रा. पंचशिलनगर याला अटक केली आहे. ठाणेदार सतीश पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मनवरे घटनेचा तपास करीत आहेत.
पांढरी खानमपूर येथील गरीब कुटुंबातील शेतमजुराची मुलगी तिच्या दोन बहिणीसह याच गावातील सामाजिक न्याय व समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात शिक्षण घेतात. ६ सप्टेंबर मंगळवारी दुपारी ४ वाजून ४८ मिनिटांनी या वसतिगृहाच्या प्रवेशद्वारावर नोंद करुन आरोपीने वसतिगृहात प्रवेश केला व आपल्या भाचीला भेटीसाठी बोलावले. तुझी आई अतिशय आजारी असून तिची प्रकृती चिंताजनक आहे, असे सांगून तिला तातडीने आपल्या सोबत अकोला येथे येण्याचे सांगितले. मामावर भरवसा ठेवून तिने वसतिगृहात सुटीचा अर्ज दिला व ती मामाच्या दुचाकीवर बसली. आरोपीने अकोट मार्गे अकोलखेडकडे दुचाकी वळविली व तो कच्च्या रस्त्याने निघाला. हा रस्ता जवळचा असल्याचे त्याने सांगितले.सख्खा मामा असल्याने तिला संशय आला नाही.व ती बिनधास्तपणे निघाली.

आरोपीजवळ आढळला चाकू
अंजनगाव सुर्जी : रस्त्यात पाईपलाईनचे खोदकाम करणाऱ्या मजुरांनी त्याला थांबवून रस्ता पुढे खराब असल्याचे सांगूनही तो थांबला नाही व आरोपीने भाचीला निर्जन शेतात नेले आणि तिच्या गळ्यावर चाकु ठेवला व आपल्या दृष्ट कृत्याची मागणी केली. घटनेच्या तीव्र तणावाने मुलगी बेशुद्ध झाली. ती मेली असे समजून आरोपी घाबरला व तेथून परतला आणि ज्या मजुरांनी त्याला थांबविले होते त्यांना आपणास वाटमाऱ्यांनी अडवून मारठोक केली व आपली भाची पळवून नेली, असे खोटेच सांगितले. त्यांनी आरोपीला माराच्या खुणा नसल्याचे सांगून त्याची अंग झडती घेतली असता मोठा चाकू आढळून आला. त्यामुळे संशय येवून त्यांनी आरोपीला पकडून ठेवले व पोलिसांना फोन केला. अकोट पोलिसांनी आरोपीस घेऊन पोलीस स्टेशन गाठले व त्याची चौकशी करुन विचारणा केली पण आरोपी सतत खोटा बोलून दिशाभूल करीत राहीला.
इकडे अकोलखेडमध्ये ही वार्ता पसरल्याने सरपंच व गावकरी युवकांनी मुलीच्या तपासात रात्रभर शेतशिवार पिंजून काढले पण मुलगी दिवस निघाल्यावर एका शेतकऱ्याला त्याच्या तुरीच्या शेतात आढळल्याने तिला सुद्धा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर खरा प्रकार लक्षात आला. घटनेची माहिती पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांना दिली. घटनेच्या दिवशी आरोपी घरी आला होता व त्याने बॅग ठेवून कपडे धुण्याची मागणी केली होती. मात्र ते असे काही करेल, असे मुलीच्या कुटुंबांच्या मनातही आले नाही.
आरोपीला भादंविच्या गंभीर गुन्ह्यात व पोस्को कायद्यांतर्गत अटक करुन त्याचा पीसीआर घेण्यात आला आहे. मुलगी वसतिगृहात नवव्या वर्गात शिकत असून मुलीला आई वडील वगळून इतर व्यक्तीच्या ताब्यात वसतिगृह प्रशासनाने का दिले? हा लाख मोलाचा प्रश्न आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Abduction of uncle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.