अल्पवयीन मुलीचे अपहरण, बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:12 IST2020-12-06T04:12:04+5:302020-12-06T04:12:04+5:30
वरूड/पुसला : वरूड तालुक्यातील एका १७ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर नागपूर येथे अतिप्रसंग करण्यात आला. २९ नोव्हेंबर ते ...

अल्पवयीन मुलीचे अपहरण, बलात्कार
वरूड/पुसला : वरूड तालुक्यातील एका १७ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर नागपूर येथे अतिप्रसंग करण्यात आला. २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत ही घटना घडली. बेनोडा पोलिसांनी याप्रकरणी आरोपी आकाश ज्योतीराव कुमरे (२४, रा. सोनेगाव खामला, जुनी वस्ती, नागपूर) याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३६३, ३७६, ५०६ व पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, पीडिताची आरोपी तरुणासोबत जुनी ओळख होती. २९ नोव्हेंबर रोजी आरोपीने पीडितास कॉल करून वरूड येथे भेटण्यासाठी बोलावले. पीडिता ही वरूडला गेली असता, आरोपीने तिला बसमध्ये बसवून नागपूर येथे काटोल रोडवर आणले. त्यानंतर आरोपीने तिला त्याच्या भावाच्या घरी फ्रेंड्स कॉलनी (नागपूर) येथे आणले. तेथे दोन दिवस ठेवले. तेथे बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी ३ डिसेंबर रोजी रात्री तक्रार दाखल करण्यात आली.
--------------