संक्षिप्त प्रादेशिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:14 IST2021-03-23T04:14:03+5:302021-03-23T04:14:03+5:30
चांदूर रेल्वे : राजर्षी शाहू सायन्स कॉलेज, इंडियन सायन्स काँग्रेस, जे.डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालय (दर्यापूर) ...

संक्षिप्त प्रादेशिक
चांदूर रेल्वे : राजर्षी शाहू सायन्स कॉलेज, इंडियन सायन्स काँग्रेस, जे.डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालय (दर्यापूर) चा प्राणिशास्त्र विभाग, मोर्शीच्या भारतीय महाविद्यालयाचा वनस्पितशास्त्र विभाग, वरूड येथील महात्मा फुले आर्टस्, कॉमर्स व सीतारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने २३ मार्च रोजी राष्ट्रीय ई-कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘रिसर्च इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट’ हा या कार्यशाळेचा विषय राहणार आहे.
------------
दीड महिन्यात ज्येष्ठांना लसीकरणाचे उद्दिष्ट
अमरावती : जिल्ह्यातील ग्रामीण भागात ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ज्येष्ठांना लसीकरणाचे उद्दिष्ट दीड महिन्यांत पूर्ण केले जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी दिली. गावातील सर्व लाभार्थींनी ‘कोविन’ पोर्टलवर नोंदणी करावी. लसीकरण केंद्रांवर रोज किमान शंभर ते दीडशे पात्र लाभार्थींच्या लसीकरणाचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रास्तरावरील लसीकरण संपल्यानंतर उपकेंद्रस्तरावर लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे, असे येडगे यांनी सांगितले.
-------------
कारची सायकलला धडक, वृद्ध जखमी
अमरावती : सायकलने घरी जात असलेल्या वृद्धाला भरधाव कारने धडक दिली. यात वृद्ध जखमी झाल्याची घटना वलगाव मार्गावरील रॉयल पॅलेसजवळ रविवारी घडली. रामकृष्ण नारायणराव दाबेराव (६५, रा. वगरखेड) असे जखमीचे नाव आहे. वैभव अशोक खानंदे (२८, रा. व्यंकटेश टाऊनशिप, अमरावती) यांनी नागपुरीगेट ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यावरून एमएच २७ एसी ०६३९ च्या चालकाविरुद्ध नागपुरीगेट पोेलिसांनी भादंविचे कलम २७९, ३३७ सहलकम १३४ मोटर वाहन कायदानुसार गुन्हा नोंदविला. जखमीवर सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आला.