संक्षिप्त प्रादेशिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:14 IST2021-03-18T04:14:03+5:302021-03-18T04:14:03+5:30
मोर्शी (अमरावती) : तालुक्यातील चिंचोली गवळी येथे रस्त्यात धक्का लागल्याच्या कारणावरून नितेश राजकुमार जवणे (३६) याची सुनील पाटील याने ...

संक्षिप्त प्रादेशिक
मोर्शी (अमरावती) : तालुक्यातील चिंचोली गवळी येथे रस्त्यात धक्का लागल्याच्या कारणावरून नितेश राजकुमार जवणे (३६) याची सुनील पाटील याने कॉलर पकडली व त्याच्या मुलाने काठी व दगडाने मारले. १५ मार्च रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी १६ मार्च रोजी मोर्शी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
--------
शेतातील लिंबू नेले चोरून
वनोजा बाग (अमरावती) : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील भंडारज शिवारातील कैलास नागोराव गिते (४०, रा. अंजनगाव सुर्जी) यांच्या शेतातील झाडाची लिंबं अज्ञात चोरट्याने लंपास केली. त्यांनी १६ मार्च रोजी तक्रार दाखल केली.
----------
माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा
चांदूर बाजार (अमरावती) : शहरातील लोही बाजार माहेर असलेल्या २१ वर्षीय विवाहितेचा अकोला येथे सासरी पैशांसाठी एक वर्षापासून छळ होत असल्याची तक्रार चांदूर बाजार पोलिसांत दाखल करण्यात आली. पोलिसांनी हर्षद मोहन मशीनकर, मोहन दयाराम मशीनकर, सागर मोहन मशीनकर व दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविला.